देव पूजेत झाल्‍या / देव पूजेत झाल्‍या चुका, तर करा हा उपाय...

Feb 26,2014 06:04:00 PM IST
इतरांच्‍या चुका समजूण घेणे व त्‍यांना क्षमा करणे हा सुखी राहण्‍याचा सर्वांत चांगला मार्ग सांगण्‍यात आला आहे. स्‍वत: कडून झालेल्‍या चूका मान्‍य करून क्षमा मागितली तर व्‍यक्तिला मन:शांती मिळते. व्‍यक्तिमध्‍ये क्षमाभाव असेल तर नाती तुटत नाहीत, ती जोडली जातात. परस्‍परांमध्‍ये आपुलकी निर्माण होते. भक्तिमध्‍ये यापेक्षा वेगळे काही नसते. ज्‍या ईश्‍वरावर व्‍यक्तिची भक्ति आहे, त्‍याने ईश्‍वराला माफी मागणे यात कमी नाही.
झालेल्‍या चुकांबद्दल ईश्‍वराला माफी मागितली, तर दु:खापासून मानसाला मुक्‍ती मिळते. व्‍यक्ति व्‍यावहारीक जिवनात ज्‍या प्रकारे चुका करतो, अशा चुका इश्‍वराची भक्‍ती करताना व्‍यक्तिकडून होऊ शकतात. देवाची पुजा करताना चुका झाल्‍या, तर घाबरून जाऊ नका, या चुका दुरूस्‍त करण्‍यासाठी शास्‍त्रामध्‍ये उपाय सांगितले आहेत. झालेल्‍या चुकाचे परिणाम आपल्‍यावर होणार नाही यासाठी शास्‍त्रामध्‍ये मंत्र सांगण्‍यात आला आहे. देवाची पूजा करते वेळी जर काही चुका झाल्‍या असतील, तर या मंत्राचे स्‍मरण करूण्‍ा देवाची माफी मागता येते.
काय आहे हा मंत्र
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर।
यत्पूजितं मया देव परिरपूर्णं तदस्तु में।।
X