Home | Jeevan Mantra | Dharm | Man Woman Love Night Information

PHOTOS : जाणून घ्या, कोणत्या वेळी स्त्री-समागम करू नये

धर्म डेस्क | Update - Jan 17, 2014, 12:36 PM IST

साधारणपणे ब्रह्मचर्य हे केवळ पुरुषांसाठीच असते असा समज आहे. खरे पाहिले तर ब्रह्मचर्य ही एक आचरणाची पद्धती आहे.

 • Man Woman Love Night Information

  साधारणपणे ब्रह्मचर्य हे केवळ पुरुषांसाठीच असते असा समज आहे. खरे पाहिले तर ब्रह्मचर्य ही एक आचरणाची पद्धती आहे. ही जीवनपद्धती स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही समान आहे. ब्रह्मचर्य हे एका शक्तीचे नाव आहे. ब्रह्म आचरण अर्थात ब्रह्मचर्य.

  एक अनुशासन अर्थात ब्रह्मचर्य. ध्येयसुसंगत जीवनशैली म्हणजे अनुशासन. शिस्त ही बाहेरून लादलेली असते, अनुशासन हे स्वत: स्वीकारलेले असते. ब्रह्मचर्याचा संबंध केवळ शारीरिक नाही. शारीरिक पातळीवर ब्रह्मचर्य स्त्री आणि पुरुषांसाठी वेगळे-वेगळे असेलच, परंतु ब्रह्मचर्याचा संदर्भ जेव्हा आपण आंतरिक शक्तीशी लावतो तेव्हा स्त्रीयांसाठीही ब्रह्मचर्याचे तेवढेच महत्त्व आहे.

  विवाहित दांपत्याने संयम-नियमाने रहावे, ब्रह्मचर्याचे पालन करीत जगावे. कामवासना दाबून ठेवायला नव्हे तर नियंत्रणात ठेवायचे योगविद्या शिकविते. मनुष्याने कामवासना आणि भोगविलासापासून नेहमी दूर राहिले पाहिजे, ब्रह्मचर्य पालन केले पाहिजे असे विचार नेहमी योग आणि धर्म अध्यात्मात ऐकायला मिळतात. परंतु काम भावना दाबून टाका, असे कधीही सांगण्यात येत नाही.

  शास्त्रामध्ये वैवाहिक जीवनात स्त्री पुरुषाने समागम करण्याच्या बाबतीत काही नियम सांगण्यात आले आहेत.

  पुढील फोटोंवर क्लिक करा आणि स्त्री-समागम केव्हा करू नये हे जाणून घ्या....

 • Man Woman Love Night Information

  अमावस्या, पौर्णिमा, चतुर्दशी आणि अष्टमी या सर्व तिथींना स्त्री-समागम केल्याने तुच्छ योनी व नरकाची प्राप्ती होते.

 • Man Woman Love Night Information

  दिवसा व दोन्ही संध्येच्या वेळी जो झोपतो किंवा स्त्री-सहवास करतो, तो सात जन्मापर्यंत रुग्ण आणि दरिद्री राहतो.

 • Man Woman Love Night Information

  निषिद्ध रात्री - पौर्णिमा, अमावस्या, प्रतिपदा, अष्टमी, एकादशी, चतुर्दशी, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण,नवरात्री इ. पर्वांच्या रात्री, श्राद्ध काळात, चातुर्मास, प्रदोषकाळ, क्षयतिथी (दोन तिथींचा समन्वय काळ) आणि मासिक पाळीच्या चार दिवसांत स्त्री-समागम करू नये.शास्त्रवर्णीत मर्यादांचे उल्लंघन करू नये.

 • Man Woman Love Night Information

  आई-वडिलांची पुण्यतिथी, स्वतःचा वाढदिवस, नक्षत्रांचा संधिकाळ (एक नक्षत्र संपून दुसरे सुरु होण्याचा काळ) तसेच अश्विनी, रेवती, भरणी, मघा,मूळ या नक्षत्रांमध्ये स्त्री-समागम वर्जित आहे.
   

 • Man Woman Love Night Information

  जे लोक दिवसा स्त्री-समागम करतात, ते खरोखर आपले प्राण क्षीण करतात. दिवसा स्त्री-समागम  विशेषतः पुरुषासाठी आयुष्यनाशक काळ मनाला गेला आहे.

 • Man Woman Love Night Information

  परस्त्री-सेवनाने मनुष्याचे आयुष्य लवकर संपते.म्हणून कोणत्याही पुरुषाने परस्त्री समागम करू नये.यासमान आयुष्य क्षीण करणारे जगात दुसरे कोणतेही काम नाही. स्त्रियांच्या शरीरावर जितकी रोमकुपे असतात, तितकी हजार वर्षे व्यभिचार पुरुषांना नरकात रहावे लागते.

 • Man Woman Love Night Information

  जर पत्नी रजस्वला असेल तर तिच्या जवळ जाऊ नये तसेच तिलाही जवळ बोलवू नये. शास्त्राची अवज्ञा केल्याने गृहस्थी फार काळ सुखी जीवन जगू शकत नाही.

Trending