आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pushya Nakshatra, Tishya, Pushya Nakshatra 2015, What To Buy In Pushya Nakshatra

आज मंगळ-पुष्य योगात या विधीने करा लक्ष्मी पूजा, हे आहेत उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्विन मासातील कृष्ण पक्षातील पुष्य नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी खरेदीचे विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी खरेदी करण्यात आलेली वस्तू दीर्घ काळापर्यंत उपयोगात येते तसेच शुभफळ प्रदान करते. या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास घरामध्ये स्थायी रुपात धन-संपत्तीचा वास राहतो. या महिन्यात 3 नोव्हेंबरला मंगळावरी मंगळ-पुष्य शुभ योग जुळून येत आहे. या दिवशी खालीलप्रमाणे लक्ष्मीची पूजा करावी..

पूजन विधी -
पूजेसाठी एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर लाल कपडा टाकून त्यावे देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. पूजेच्या दिवशी घर स्वच्छ करून स्वतः पवित्र होऊन श्रद्धापूर्वक महालक्ष्मीची पूजा करावी. महालक्ष्मीच्या मूर्तीजवळच एका स्वच्छ भांड्यात केशरयुक्त चंदनाने अष्टदल कमळ काढून त्यावर दागिने किंवा थोडे पैसे ठेवा. सर्वप्रथम पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून स्वतःवर पाणी शिंपडून घ्यावे तसेच पूजन सामग्रीवर खालील मंत्राचा उच्चार करून पाणी शिंपडावे...

ऊं अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा।
य: स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तर: शुचि:।।

त्यानंतर जल-अक्षता(तांदूळ) हातामध्ये घेऊन पूजेचा संकल्प करावा...
ऊं मनो जूतिर्जुषतामाज्यस्य बृहस्पतिर्यज्ञमिमं तनोत्वरिष्टं यज्ञ समिमं दधातु। विश्वे देवास इह मादयन्तामोम्प्रतिष्ठ।।
ऊं अस्यै प्राणा: प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।
अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन।।

खालील मंत्राचा उच्चार करून महालक्ष्मीची षोडशोपचार पूजा करा.
ऊं महालक्ष्म्यै नम -

प्रार्थना- विधिपूर्वक श्रीमहालक्ष्मीची पूजा केल्यानंतर हात जोडून देवीकडे प्रार्थना करावी
सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकै-
र्युक्तं सदा यक्तव पादपकंजम्।
परावरं पातु वरं सुमंगल
नमामि भक्त्याखिलकामसिद्धये।।
भवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी।।
सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते।।
नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।।
ऊं महालक्ष्म्यै नम:, प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि।

समर्पण - पूजेच्या शेवटी कृतोनानेन पूजनेन भगवती महालक्ष्मीदेवी प्रीयताम्, न मम।

या मंत्राचा उच्चार करून समस्त पूजन कर्म भगवती महालक्ष्मीला समर्पित करावे.

मंगळ-पुष्य योगात मंगळदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात. हे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...