आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळ-पुष्यमध्ये धन वृद्धीचा योग, हे आहेत खरेदीचे शुभ मुहूर्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (3 नोव्हेंबर) मंगळ-पुष्य शुभ योग आहे. पुष्य नक्षत्रामध्ये चंद्र कर्क राशीत स्थित असून ही चंद्राच्या स्वामित्वाची रास आहे. तसेच मंगळवार असल्यामुळे हा धन वृद्धीचा योग तयार करत आहे. चंद्र-मंगळ मित्र ग्रह असल्यामुळे मंगळ-पुष्य योग सर्वांसाठी लाभकारी राहील. मंगळ-पुष्य सोबतच आज अंगारक. शुभ आणि प्रवर्ध नावाचे योगही जुळून येत आहेत.

संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहील पुष्य नक्षत्र -
पुष्य नक्षत्राची सुरुवात 2 नोव्हेंबरला सोमवारी संध्याकाळी 04.30 पासून झाली आहे. हे नक्षत्र 3 नोव्हेंबरला मंगवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहील. यानंतर मंगळ-पुष्य योग 22 ऑक्टोबर 2019 ला जुळून येईल. यापूर्वी हा योग 6 नोव्हेंबर 2012 मध्ये जुळून आला होता. पुष्य नक्षत्रामध्ये खरेदी करण्यात आलेल्या वस्तू दीर्घकाळापर्यंत उपयोगात येतात आणि शुभफळ प्रदान करतात.

हे आहेत खरेदीचे शुभ मुहूर्त -
सकाळी 09:25 पासून 10:50 पर्यंत- चल
सकाळी 10:50 पासून 12:15 पर्यंत- लाभ
दुपारी 12:15 पासून 1:38 पर्यंत- अमृत
दुपारी 2:50 पासून संध्याकाळी 4:15 - शुभ

मंगळ-पुष्यमध्ये आणखी कोणकोणते योग जुळून येत आहेत आणि राशीनुसार काय खरेदी करावे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...