आषाढ महिना सरू लागल्यावर ऊन-पावसाचा सुंदर खेळ रंगत श्रावणाची चाहूल लागते. श्रावण हा सर्वांना हवाहवासा वाटणारा महिना आहे.
निसर्गातील ताजेपणा, मनाची प्रसन्नता आणि संयमित आहार-विहार म्हणजे सदासर्वकाळ श्रावण असणे होय. घराघरातील दरवळ समुद्रापलीकडेही पोहोचते. श्रावण महिन्यापासून चतुर्मासाला सुरुवात होते. श्रावण हा पवित्र महिना असून, व्रतवैकल्यांना प्रारंभ होतो. मंगळागौरीचे खेळ सुहासिनींच्या घरी रंगू लागतात. लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर ही याच महिन्यातील मंगळवारी साजरी केली जाते. पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी संबंध जोडून महिलांच्या कलागुणांना आणि मुख्य म्हणजे रिलॅक्स होण्यासाठी या सणांची योजना केली आहे.
मंगळागौर ही सौभाग्यदेवता मानली जाते. श्रावणातील मंगळवारी मंगळागौरची पूजा करण्यात येते. नवविवाहित तरुणी सलग पाच वर्षे मंगळागौर बसवते. पतीच्या संरक्षणासाठी हे व्रत ठेवले जाते. यानिमित्ताने महिला एकत्रित येऊन मंगळागौरचे खेळ खेळतात. या खेळात स्वयंपाकघरातील वस्तूंचा वापर कल्पकतेने केला जातो.
पुढे जाणून घ्या, मंगळागौर पूजेचा विधी...