आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या श्रावण महिन्यातील मंगळागौरीच्या पूजेचे महत्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आषाढ महिना सरू लागल्यावर ऊन-पावसाचा सुंदर खेळ रंगत श्रावणाची चाहूल लागते. श्रावण हा सर्वांना हवाहवासा वाटणारा महिना आहे. ऊन-पावसाच्या या खेळात सायंकाळी इंद्रधनुष्याची दुर्मिळ शोभा श्रावणशोभेत मोठी भर घालते.

निसर्गातील ताजेपणा, मनाची प्रसन्नता आणि संयमित आहार-विहार म्हणजे सदासर्वकाळ श्रावण असणे होय. घराघरातील दरवळ समुद्रापलीकडेही पोहोचते. श्रावण महिन्यापासून चतुर्मासाला सुरुवात होते. श्रावण हा पवित्र महिना असून, व्रतवैकल्यांना प्रारंभ होतो. मंगळागौरीचे खेळ सुहासिनींच्या घरी रंगू लागतात. लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर ही याच महिन्यातील मंगळवारी साजरी केली जाते. पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी संबंध जोडून महिलांच्या कलागुणांना आणि मुख्य म्हणजे रिलॅक्स होण्यासाठी या सणांची योजना केली आहे.