आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे कधी थंड पडत नाही चीतांची आग, 24 तास जळत राहतात मृतदेह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - काशीमध्ये महास्मशान मणिकर्णिका घाटावर शेकडो वर्षांपासून चिता जळत असून या आजपर्यंत विझल्या नाहीत. मान्यतेनुसार अघोर स्वरुपात शिव येथे विराजमान आहेत. काशीमध्ये मृत्यू झाल्यास आणि येथे अंत्यसंस्कार केल्यास मृत व्यक्तीला महादेव तारक मंत्र देतात. येथे मोक्ष प्राप्त करणारा कधीही पुन्हा गर्भात पोहोचत नाही.

त्रिशुळावर उभी आहे काशी
काशी विश्वनाथ मंदिराचे प्रमुख आचार्य पं श्रीकांत मिश्र सांगतात की, पुराण आणि धर्मशास्त्रामध्ये काशी भगवान शंकराच्या त्रिशुळावर उभी असल्याचे वर्णीत आहे. मणिकर्णिका घाटाची स्थापना अनादी काळात झाली आहे. सृष्टीच्या रचनेनंतर भगवान शिवने स्वतःच्या निवासासाठी हे नगर वसवले आणि भगवान विष्णू यांना धर्म कार्यासाठी पाठवले होते.

कसे पडले कुंडाचे नाव
भगवान विष्णू यांनी हजारो वर्षांपर्यंत मणिकर्णिका घाटावर तप केले होते. महादेव प्रकट झाल्यानंतर भगवान विष्णूंनी आपल्या चक्राने पुष्कर्णी तलाव (कुंड) चे निर्माण केले होते. तत्पूर्वी त्यांनी कुंडात स्नान केले होते. या दरम्यान त्यांच्या कानातील मुक्तायुक्त कुंडल पाण्यात पडले. त्यानंतर या कुंडाचे नाव मणिकर्णिका कुंड असे पडले. या कुंडाचा इतिहास पृथ्वीवर गंगा अवतरण पूर्वीचा मानला जातो.

शिव देतात तारक मंत्र
पं शैलेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महास्मशान मणिकर्णिका घाट महादेवाचे आवडते ठिकाण होते. मान्यतेनुसार बाबा विश्वनाथ आणि देवी पार्वती अन्नपूर्णा रुपात भक्तांचे कल्याण करतात. भगवान शिव अघोर स्वरुपात मृत व्यक्तीच्या कानात तारक मंत्र सांगून त्याला मुक्तीचा मार्ग देतात. याच कारणामुळे मणिकर्णिका घाटावर चीतांचा अग्नी नेहमी जळत राहतो.

काय सांगतात घाटावरील स्थानिक लोक
घाटावर राहणारे एक वृद्ध नरेश बिसवानी सांगतात की, महादेव चितेच्या भस्माने शृंगार करतात. यामुळे येथील चितेचा अग्नी थंड पडत नाही. दररोज कमीतकमी 30 ते 35 चिता जळतात. अंत्यसंस्कारासाठी केवळ वाराणसीतूनच नाही तर देशाच्या कानाकोपर्यातून लोक येतात. हे ठिकाण मुक्तिधाम नावानेसुद्धा प्रसिद्ध आहे.

पुढील स्लाईड्सवर पाहा येथील काही खास फोटो आणि वाचा रोचक माहिती...