आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mantra For Keep Away Misfortune By Make Prayer Lord Shiv And Surya

भाग्‍योदय होण्‍यासाठी रविवारी करा सुर्यदेवाची पूजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्‍ये पंच तत्त्वाच्‍या पूजेला विशेष महत्त्व आहे. पंचदेव म्‍हणजे ईश्वराचे पाच स्‍वरूप यामध्‍ये श्री गणेश, शिव शंकर, सुर्य, दुर्गा आणि भगवान विष्‍णुचा समावेश होतो. या पंचदेवाचे विशेष महत्त्व असून जगाची रचना, रक्षणाचे काम हे पंचदेव करतात.
शिवपुराणात सुर्यदेवाला शिव शंकराचा तिसरा डोळा म्‍हटले आहे. सुर्यदेव शिवशंकराचे रूप असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. शिवशंकर आणि सुर्यदेवाची उपासना केल्‍यानंतर सुख, स्‍वास्‍थ, चांगले राहण्‍याबरोबच भितीपासून मानसाला मुक्‍ती मिळते.
रविवारी केलेली सुर्याची पूजा शुभ मानली जाते. आज रविवारी आणि उद्या सोमवारच्‍या पोर्णिमेला केलेली पूजा लाभदाय ठरणार आहे. शास्‍त्रामध्‍ये सांगण्‍यात आलेला मंत्राचे पठण उगवत्‍या सुर्यदेवासमोर केले तर दु:खाचे निराकारण होते. संकटापासून मुक्‍ती मिळते. यामुळे या दिवशी सुर्याची पूजा शुभ मानली जाते.
या पूजेचा शिवमंत्राला महामृत्‍यूजय मंत्र म्‍हणून ओळखला जातो. सुख आणि सौभाग्‍य वाढवण्‍यासाठी रामबाण उपाय म्‍हणून या मंत्राला ओळखले जाते.
विधि-
सुर्योदय होण्‍याआगोदर स्‍नान करून तांब्‍याच्‍या पात्रात लाल फूल, लाल चंदन ठेवा. सुर्यदेवाकडे मुख करून या शिव मंत्राचे स्‍मरण करा.
मृत्युञ्जयायरुद्राय नीलकण्ठाय शम्भवे।
अमृतेशायशर्वाय महादेवायते नम:।।
देवघरात सकाळी आणि सांयकाळी शिव शंकरची गंध, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य या साम्रगीचा वापर करा.
अशा प्रकारे पूजा केल्‍यांनतर संकट, दु:ख, यातना यापासून तुम्‍हाला मुक्‍ती मिळेल.