आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून \'मस्‍कऱ्या\' गणेशोत्‍सव; 260 वर्षांची परंपरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - लोकमान्‍य टिकळांनी सार्वजनिक गणेशोत्‍सवाला सुरुवात केली, हे सर्वश्रुत आहे. पण, त्‍यांच्‍याही पूर्वी पूर्व विदर्भात 'मस्‍कऱ्या गणपती' नावाने सार्वजनिक गणेशोत्‍सव साजरा केला जातो. त्‍याला 'हाडपक्या' असेही म्‍हटले जाते. टिकळकांच्‍या उत्‍सवामागील एकता, प्रबोधन हा हेतू या मस्‍कऱ्या उत्‍सवामागे नव्‍हता. केवळ नागरिकांचे, भाविकांचे मनोरंजन करणे हाच याचा हेतू असतो. अनंत चतुर्थच्‍या दुसऱ्या दिवशी म्‍हणजेच पितृपंधरवड्याच्‍या पहिल्‍या दिवशी त्‍याची स्‍थापना केली जाते. 15 दिवसानंतर त्‍याचे विसर्जन होते. आज (सोमवार) नागपूर, गोदिंया, भंडारा या जिल्‍ह्यांसह मध्‍यप्रदेशातील काही भागांत मस्‍कऱ्या गणपतीची स्‍थापना केली जाणार आहे. त्‍याचे हे 260 वे वर्षे आहे. या बाबत दोन अख्‍यायिका आहेत. त्‍यांची माहिती खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
का पडले मस्‍कऱ्या नाव ?
श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले उपाख्य चिमणाबापू यांच्‍या सैन्‍यात अठरापगड जातीचे सैनिकही होते. मात्र, गणेशोत्‍सवात मागासवर्गीय भाविकांना राजवाड्यात असलेल्‍या गणेशाचे दर्शन, प्रसाद घ्‍यायला आत येता नसे. त्‍यामुळेच त्‍यांच्‍यासाठी महाराजांनी अनंत चुर्तथीच्‍या दुसऱ्या दिवशी वर्ष 1755 मस्‍कऱ्या गणेशोत्‍सवाला सुरुवात केली. यासाठी बाहेर गणपतीची रस्‍त्‍यावर स्‍थापना केली. यात उच्‍च, निच्‍च असा कुठलाच भेद पाळला गेला. पुढे हा उत्‍सव सार्वज‍निक झाला. दरम्‍यान, गणेश चुतर्थीप्रमाणे या उत्‍सवाला भाविक गांभीर्याने घेत नसल्‍याने त्‍याला 'मस्‍कऱ्या' या नावाने ओळखले जाऊ लागले. नंतर मस्‍कऱ्या गणेश मंडळासमोर विनोदी कार्यक्रमही होऊ लागले, अशी या उत्सवा मागील एक अख्याखिका आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा काय आहे दुसरी अख्‍यायिका....?