आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मौनी अमावस्या आज : या विधीने करा व्रत; वाचा, महत्त्वाच्या खास गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगानुसार पौष मासातील अमावस्येला मौनी अमवस्या म्हणतात. या दिवशी दान, स्नान, श्राद्ध, व्रत करण्याचे विशेष महत्त्व हिंदू धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे. या वर्षी मौनी अमवस्या 20 जेनेवारी, मंगळवारी आहे. मौनी अमावस्येचे व्रत या प्रकारे करावे...

अमावास्येच्या दिवशी सकाळी स्नान करून ब्रह्मदेव आणि गायत्री देवीचे पूजन करावे. गाय, सोने, छत्री, पलंग, दर्पण (आरसा) इ. वस्तूंचे मंत्रोच्चार करून ब्राह्मणाला दान करावे. पवित्र मनाने ब्राह्मण आणि कुटुंबीयांसोबत भोजन करावे. या दिवशी पिंपळाला अर्घ्य देऊन प्रदक्षिणा घालाव्यात आणि दीपदान करावे.

चंद्राला मनाचा स्वामी मानण्यात आले असून अमावस्येला चंद्र दर्शन होत नाही. यामुळे या दिवशी मनःस्थिती कमजोर होते. यामुळे या दिवशी मौन व्रत ठेवून मनावर संयम ठेवून दान-पुण्य करण्याचे विधान आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, मौनी अमावास्येशी संबंधित काही रोचक आणि महत्त्वाच्या गोष्टी...