देशभरात सध्या नवरात्रोत्सव भक्तिभावाने साजरा केला जात आहे. प्रसिद्ध देवी मंदिरांमध्ये सध्या भक्तांची अलोट गर्दी होत आहे. परंतु राजस्थानच्या मेंहदीपुर बालाजी धाममध्ये वेगळेच दृश्य पाण्यास मिळत आहे. शारदीय नवरात्रीमध्ये येथे प्रेत बाधा दूर करण्यासाठी विशेष उपाय केले जातात. मेहंदीपूर बालाजीला दुष्ट आत्म्यांपासून मुक्ती मिळवून देण्यार्या दिव्य शक्तीने प्रेरित हनुमानाचे शक्तिशाली मंदिर मानले जाते.
येथे अनेक लोकांना साखळदंडात बांधलेले आणि उलटे लटकचलेले तुम्ही पाहू शकता. हे मंदिर आणि याच्याशी संबंधित चमत्कार पाहून कोणीही आचंबित झाल्याशिवाय राहत नाही. संध्याकाळी बालाजीची आरती सुरु होताच भूतप्रेताने पिडीत लोक नाचू लागतात. येथे बालाजीसमोर बाधाग्रस्त लोक आपल्या समस्या मांडतात.
एकहजार वर्ष जुने आहे मंदिर
गीताप्रेस गोरखपुरने प्रकाशित केलेल्या हनुमान अंकानुसार हे मंदिर जवळपास एकहजार वर्ष जुने आहे. येथे एका मोठ्या पर्वतावर हनुमानाची मूर्ती स्वतः तयार झाली होती. या मूर्तीला हनुमानाचे स्वरूप मानले जाते. यांच्या चरणाजवळ एक छोटेसे कुंड असून यामधील पाणी कधीही कमी होत नाही. हे मंदिर अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारिक मानले जात असल्यामुळे संपूर्ण देशातून येथे लोक दर्शनासाठी येतात.
साखळदंडात बांधून आणले जाते पीडितांना
वाईट आत्मा आणि काळ्या जादूपासून मुक्ती मिळवण्यासाठी लोक येथे येतात. या मंदिराला अशा त्रासांमधून मुक्ती मिळवण्याचा एकमेव मार्ग मानले जाते. मंदिरातील पंडित अशा समस्यांना दूर करण्यासाठी विविध उपाय करतात. शनिवार आणि मंगळवारी येथे येणार्या भक्तांची संख्या लाखोच्या घरात असते. अनेक गंभीर रुग्णांना लोखंडाच्या साखळदंडात बांधून मंदिरात आणले जाते. येथे येणार्या पिडीत लोकांना पाहून सामान्य लोकांचा आत्माही थरथर कापू लागतो. हे लोक मंदिराच्या बाहेर बसून मोठ-मोठ्याने ओरडत स्वतःमधील वाईट आत्म्याविषयी सांगतात. हे लोक औषध न घेता तंत्र-मंत्राच्या जोरावर स्वस्थ होऊन परत जातात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा मेंहदीपुर बालाजी दरबारातील काही खास फोटो...