Home | Jeevan Mantra | Dharm | Miraculous Effect And Mantra Of Durgashapsati

का चमत्कारिक आहेत दुर्गासप्तशतीचे मंत्र आणि कोणत्या मंत्राने पूर्ण होतील सर्व इच्छा

धर्म डेस्क | Update - Jan 17, 2014, 01:10 PM IST

जगतजननी दुर्गा देवीला आदिशक्ती म्हटले जाते. शास्त्रामध्ये या आदिशक्तीच्या विविध रूपांची महती सांगण्यात आली आहे.

 • Miraculous Effect And Mantra Of Durgashapsati

  जगतजननी दुर्गा देवीला आदिशक्ती म्हटले जाते. शास्त्रामध्ये या आदिशक्तीच्या विविध रूपांची महती सांगण्यात आली आहे. देवी शक्तीचे विशेषतः तीन रूप जगप्रसिद्ध आहेत - महादुर्गा, महालक्ष्मी आणि महासरस्वती.

  देवी उपासना संसारिक जीवनातील सर्व दुःख दूर करून भरपूर सुख देणारी मानली गेली आहे. ही शक्ती साधनेच्या स्वरूपातही प्रसिद्ध आहे. यासाठी विविध देवी मंत्र, स्तोत्र, स्तुतींचे महत्व सांगण्यात आले आहे.

  दुर्गासप्तशतीचे पाठ खूप लाभदायक आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्रदान करणारे मानले गेले आहेत. याच कारणामुळे दुर्गासप्तशती आणि त्यातील प्रत्येक मंत्र शक्तिशाली,चमत्कारी मानला जातो.

  दुर्गासप्तशती आणि त्यातील मंत्र एवढे मंगलकारी, शक्तिशाली आणि चमत्कारी का मानले जातात? हे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

 • Miraculous Effect And Mantra Of Durgashapsati

  दुर्गासप्तशती मार्कंडेय पुरणाचा एक भाग आहे. जो वेदव्यास रचित पवित्र पुराणातील एक आहे. श्रीव्यास यांना भगवान विष्णूचे अवतार मानले जाते.

 • Miraculous Effect And Mantra Of Durgashapsati

  मार्कंडेय पुराणामध्ये मार्कंडेय ऋषींनी दुर्गासप्तशती स्वरुपात जगतजननी देवी भगवतीच्या शक्तींची स्तुती केली आहे.

 • Miraculous Effect And Mantra Of Durgashapsati

  यामध्ये देवीच्या शक्तीचा महिमा वर्णन करताना सातशे मंत्र सांगण्यात आले आहेत. यामुळे याला सप्तशती असे नाव पडले आहे. यामध्ये देवीच्या 3६० शक्तींचा महिमा सांगण्यात आला आहे.

 • Miraculous Effect And Mantra Of Durgashapsati

  दुर्गासप्तशती मंगलकारी असण्यामागे धार्मिक कारण असे आहे की, जगतपालक भगवान विष्णुदेवाने  वेदव्यास स्वरुपात अवतार घेऊन या शक्तीचे रहस्य सांगितले आहे. यामधील सर्व मानत, श्लोक संस्कृत भाषेत आहेत. संस्कृत भाषेला देववाणी संबोधले जाते. या सर्व कारणामुळे दुर्गासप्तशती चमत्कारी आणि मंगलकारी मानली जाते. हे मंत्र प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा अचूक उपाय मानले गेले आहे.
  दुर्गासप्तशतीचे काही खास मंगलकारी मंत्र आणि पूजा विधी जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

 • Miraculous Effect And Mantra Of Durgashapsati

  मनुष्याचे मन अशांत आणि तणावग्रस्त असेल तर त्याचे कामात आणि कुटुंबामध्ये मन रमत नाही. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मनुष्याचे वाईट पाउल पडू शकते. त्यामुळे मनुष्याने स्वतःचे काय चुकले याचा शांत मनाने विचार करावा.

  धार्मिक दृष्टीनुसार तन, मन, धन किंवा ग्रहदोषामुळे निर्माण होणारी भीती, कुटुंबावर आलेले संकट दूर करण्यासाठी देवीची उपासना करणे हा एक उत्तम मार्ग आहे. त्यासाठी शुक्रवारी किंवा देवी उपासनेच्या शुभ मुहूर्तावर दुर्गासप्तशतीच्या मंत्राचा जप करावा.

  पुढे दिलेल्या दुर्गासप्तशती मंत्राचा ध्यानपूर्वक जप केल्याने मनातील भीती संपून जाते. कुटुंबातील अशांततेचे वातावरण बदलू लागते. काम करण्यात मन लागते. सर्व अडचणी दूर होण्यास मदत होते

  - शुक्रवारी शुभ मुहूर्तावर स्नान केल्यानंतर दुर्गा देवीच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची चौरंगावर लाल वस्त्र टाकून, अष्टदल कमळावर स्थापना करा.

  - पूजा करताना देवीला लाल कुंकू, अक्षता, फुल, लाल ओढणी, दक्षणा अर्पण करा. देवीला खीर किंवा पेढ्याचा नैवैद्य दाखवा.

  मंत्र जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

 • Miraculous Effect And Mantra Of Durgashapsati

  भाग्य बाधा दूर करण्यासाठी आणि सौभाग्य प्राप्तीसाठी...
  देहि सौभाग्य आरोग्यं देहि में परमं सुखम्।
  रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि।।

 • Miraculous Effect And Mantra Of Durgashapsati

  सर्व प्रकारच्या बाधा, अडचणी दूर करण्यासाठी...
  सर्व बाधा विनिर्मुक्तो, धन धान्य सुतान्वितः।
  मनुष्यों मत्प्रसादेन भविष्यति न संशयः॥

 • Miraculous Effect And Mantra Of Durgashapsati

  अभाव, दरिद्रता किंवा दुःख दूर करण्यासाठी...
  दुर्गे स्मृता हरसि भीतिशेषजन्तोः स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभां ददासि।
  दारिद्रयःखभयहारिणि का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्दचित्ता।।

 • Miraculous Effect And Mantra Of Durgashapsati

  सर्व प्रकराची सुख-समृद्धी प्राप्त करण्यासाठी...
  ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
  शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।

Trending