Home | Jeevan Mantra | Dharm | Mythological fact of garud puran news in marathi

गरुड पुराण : या 7 गोष्टींकडे फक्त पाहिले तरी प्राप्त होऊ शकते पुण्य

जीवनमंत्र डेस्क | Update - Dec 17, 2016, 02:03 PM IST

आयुष्यात पुण्य आणि लाभ प्राप्त करण्यासाठी मनुष्य विविध प्रकारचे धर्म-कर्म करतो. शास्त्रामध्ये पुण्य प्राप्त करून देणारे विविध कर्म सांगण्यात आले आहेत.

 • Mythological fact of garud puran news in marathi
  आयुष्यात पुण्य आणि लाभ प्राप्त करण्यासाठी मनुष्य विविध प्रकारचे धर्म-कर्म करतो. शास्त्रामध्ये पुण्य प्राप्त करून देणारे विविध कर्म सांगण्यात आले आहेत. गरुड पुराणामध्येही काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याकडे केवळ पाहून मनुष्याला पुण्य आणि लाभ प्राप्त होऊ शकतो.

  गोमूत्रं गोमयं दुन्धं गोधूलिं गोष्ठगोष्पदम्।
  पक्कसस्यान्वितं क्षेत्रं द्ष्टा पुण्यं लभेद् ध्रुवम्।।

  अर्थ - गोमुत्र, शेण, गोदुग्ध, गोधुली, गोशाळा, गोखुर आणि धान्य उगवलेले शेत पाहून पुण्य प्राप्त होते.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या गोष्टींकडे केवळ पाहून पुण्य का प्राप्त होते...

 • Mythological fact of garud puran news in marathi
  गोमुत्र -
  गोमुत्र अत्यंत पवित्र मानले जाते. शास्त्रानुसार गोमुत्रामध्ये गंगेचा वास असतो. गोमुत्राचा औषधी रुपातही उपयोग केला जातो. गोमुत्राचे सेवन करून विविध आजारांवर उपचार केले जाऊ शकतात. गोमुत्र धारण केल्याने मनुष्याच्या इच्छा पूर्ण होतात परंतु गरुड पुराणानुसार गोमुत्र केवळ बघितल्याने मनुष्याला पुण्य आणि लाभ प्राप्त होतो.
 • Mythological fact of garud puran news in marathi
  शेण
  हिंदू धर्मामध्ये गाय पूजनीय आहे. शास्त्रामध्ये गायीला देवासमान मानले जाते. कोणतेही स्थान पवित्र करण्यासाठी गायीच्या शेणाचा उपयोग केला जातो. मनुष्याने पवित्र भावनेने गायीच्या शेणाकडे फक्त बघितले तरी त्याला पुण्य प्राप्त होते.
 • Mythological fact of garud puran news in marathi
  गायीचे दुध
  गायीच्या दुधाचे अनेक फायदे आहेत. गायीचे दुध अनेक रोगांवर औषधीचे काम करते. कलियुगात गायीचे दुध अमृतासमान मानले गेले आहे. जय व्यक्ती गायीला दुध देताना पाहतो त्याला निश्चितच शुभफळ प्राप्त होते.
 • Mythological fact of garud puran news in marathi
  गोधुली
  अनेकदा गाय स्वतःच्या पायाने जमीन उकरते. असे केल्यामुळे जमिनीतून जी धूळ निघते , त्याला गोधुली, गोधूळ म्हणतात. गायीच्या पायाखालची माती पवित्र मानली जाते. गोधूळ केवळ पाहूनच मनुष्याला पुण्य प्राप्त होते.
 • Mythological fact of garud puran news in marathi
  गोशाळा
  ज्या ठिकाणी गायींना ठेवले जाते, त्याला गोशाळा म्हणतात. गोशाळासुद्धा मंदिराप्रमाणे पवित्र आणि पूजनीय असते. जो व्यक्ती नियमितपणे गोशाळेत जाऊन गायींची सेवा करतो, त्याला निश्चितच श्रीकृष्णाचे धाम गोलोकाची प्राप्ती होते. जो व्यक्ती गोशाळेत जाऊन गायींची सेवा करू शकत नाही, त्याने केवळ शुद्ध मनाने गोशाळेचे दर्शन घेतल्यास पुण्य प्राप्त होते.
 • Mythological fact of garud puran news in marathi
  धान्य उगवलेले शेत
  हिरवीगार शेती पाहणे सर्वांना आवडते. हिरवेगार शेत पाहून मन प्रसन्न होते. धान्य उगवलेले शेत केवळ सुंदरतेचे नाही तर पुण्याचे प्रतिक असते. गरुड पुराणानुसार धान्य उगवलेले शेत पाहून मनुष्य पुण्य आणि लाभ प्राप्त करू शकतो.

Trending