हिंदू धर्मानुसार निसर्गातील प्रत्येक प्राणी, वनस्पतीमध्ये ईश्वराचा अंश आहे.
आपल्या ऋषीमुनींनी त्यामध्ये धर्म भाव निर्माण करण्यासाठी धर्माशी संबंधित विशेष, तिथी, वार किंवा सणाचे निर्धारण केले आहे. याच क्रमामध्ये नागाला देव प्राणी मानण्यात आले आहे. यामुळे श्रावण मासातील शुक्ल पक्ष पंचमी तिथी (19 ऑगस्ट, बुधवार)ला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी नागाचे विशेष पूजन केले जाते.
नागपांची हा उत्सव असा संदेश देतो की, नागांची उत्पत्ती मनुष्याला इजा पोहचवण्यासाठी झाली नसून नाग पर्यावरण संतुलन कायम ठेवतात. आप देश कृषीप्रधान देश असून नाग शेतीला नुकसान पोहचावनार्या उंदीर आणि कीटकांचे भक्षण करून शेतातील पिकाचे रक्षण करतो. अशाप्रकारे नाग आपल्यासाठी फायदेशीर आहेत.
यामुळे नागांना मारू नये. विशेषतः नागपंचमी नाग जातीप्रती आपण कृतज्ञतेचा भाव प्रकट करण्याचा उत्सव आहे. हा सण प्राणी जगताची सुरक्षा, अहिंसा, करुणा आणि सहनशीलतेची शिकवण देणारा सण आहे. यामुळे आपण सर्वांनी नागपंचमीच्या दिवशी सत्याची, मांगल्याची पूजा करून नवजीवन फुलवण्याची प्रतिज्ञा अवश्य करावी.