Home | Jeevan Mantra | Dharm | Naga Sadhu Examination Of Brahmacharya, Entered The Akhada Is Not Easily

नागा साधूनांही द्यावी लागते ब्रह्मचर्याची परीक्षा, सहजासहजी मिळत नाही प्रवेश

धर्न डेस्क | Update - Jan 08, 2014, 03:06 PM IST

संत-साधूंचे आयुष्य किती सोपे आहे.

 • Naga Sadhu Examination Of Brahmacharya, Entered The Akhada Is Not Easily
  संत-साधूंचे आयुष्य किती सोपे आहे. त्यांना कसलीच चिंता नाही. घेतली झोळी की निघाले, असं उथळ मत मांडून आपण मोकळे होतो. परंतु, डॉक्टर, इंजिनिअर बनण्यासाठी जेवढा वेळ लागतो, त्यापेक्षा अधिक वेळ नागासाधूला आपले कर्तुत्त्व सिद्ध करण्‍यासाठी लागत असतो; साधू बनण्याची प्रक्रिया जितकी जटील तितकीच रंजकही आहे.
  साधू बनण्यासाठी अनेक गुंतागुंतीच्या परीक्षेतून जावे लागते. जूना मठाचे विजयगिरी महाराज सांगतात, साधूना एक लष्करातील जवानाप्रमाणे कठोर परिश्रम घ्यावे लागतात. साधू बनण्यासाठी आपण सामान्य माणसापेक्षा वेगळे आहेत, हे सिद्ध करावे लागते. साधू बनण्यातच काहींचे आयुष्यही संपून जाते.
  पुढील स्लाइडवर वाचा, नागा साधू बनण्यासाठी कोणत्या कसोट्या पार कराव्या लागतात....

 • Naga Sadhu Examination Of Brahmacharya, Entered The Akhada Is Not Easily
  चौकशी- 
  एखादा व्यक्ती साधू बनण्यासाठी जथ्यात आल्यानंतर सहजासहजी त्याला प्रवेश मिळत नाही. त्याला साधू का बनायचे आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे. याबाबत त्याची कसून चौकशी केली जाते. पूर्ण शहानिशा झाल्यानंतर त्यास जथ्यात प्रवेश दिला जातो. 
 • Naga Sadhu Examination Of Brahmacharya, Entered The Akhada Is Not Easily
  ब्रह्मचार्याची परीक्षा-
  जथ्थ्यात प्रवेश मिळाल्यानंतर त्याची ब्रह्मचार्याची परीक्षा घेतली जाते. संबंधित व्यक्ती पूर्णपणे इच्छा आणि वासनेपासून मुक्त झाला आहे की नाही, याची खात्री व्हायला खूप काळ लोटला जातो. तसेच संबंधित व्यक्ती गुरू आणि जथ्याची दीक्षा घेण्यास योग्य आहे, याची खात्री झाल्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात हो
 • Naga Sadhu Examination Of Brahmacharya, Entered The Akhada Is Not Easily
  महापुरूष-
  त्या व्यक्तीने ब्रह्मचार्याची परीक्षा पार केल्यानंतरच तो महापुरूष बनतो. शिव, विष्णु, शक्ती, सूर्य, आणि गणपती या पाच गुरुंची दीक्षा घ्यावी लागते.  त्यानंतर त्याला भस्म, भगवे वस्त्रे आणि रूद्रक्षांची माळ दिली जाते. या वस्तू म्हणजेच नागासाधूंचा अलंकार समजला जातो. 
 • Naga Sadhu Examination Of Brahmacharya, Entered The Akhada Is Not Easily
  अवधूत-
  महापुरूषानंतर साधूला अवधूत बनवले जाते. त्याचे केस कापले जातात. अवधूत बनण्यासाठी त्याला आधी स्वत:चे पिंडदान करावे लागते. जथ्थ्यातील पुरोहीत हे पिंडदान करतात. यामाध्यमातून संबंधित व्यक्ती हा समाज आणि कुटूंबियांसाठी मृत झाल्याचे सिद्ध होते. त्यानंतर वैदिक धर्माची रक्षा करणे हा त्याच्या जीवनाचा एकमेव उद्देश बनतो. 
 • Naga Sadhu Examination Of Brahmacharya, Entered The Akhada Is Not Easily
  लिंग भंग-
  या प्रक्रियेमध्ये साधूंना 24 तास उपाशी जथ्थ्याच्या झेंड्याखाली उभे राहवे लागते. झेंड्याखाली उभे असताना त्याच्या खांद्यांवर एक काठी आणि हातात एक मातीचे भांडे दिलेले असते. जथ्थ्याचे पहारेदार या वेळी साधूंवर लक्ष्य ठेऊन असतात. या नंतर जथ्थ्यातील मुख्यसाधू या साधूच्या लिंगाला मंत्रोपच्चार करून त्याला जोरात झटका देऊन ते निष्किय केले जाते. यानंतर तो व्यक्ती नागा साधू बनतो. 
 • Naga Sadhu Examination Of Brahmacharya, Entered The Akhada Is Not Easily
  नाग साधूंचे पद आणि अधिकार-
  नागा साधूंची अनेक पद व अधिकार असतात. नागा साधू बनल्यानंतर त्याची बढती होत राहते. नागा साधू, महंत, जातीय मंहत, थानपती महंत, पीर महंत, दिगंबरश्री, महामंडलेश्वर आदी पदे त्याला मिळत असतात.

Trending