आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभपर्व : ध्वजाराेहणाने शंखनाद, जाणून घ्या ध्वजपर्वाचा इतिहास आणि महत्त्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भक्ती, श्रद्धा, परंपरा अन् अध्यात्म यांचा महासंगम म्हणूनच ख्यात अशा हजाराे वर्षांपासून चालत आलेल्या कुंभमेळ्याला मंगळवार(दि.१४)पासून उत्सवपूर्वक प्रारंभ हाेताेय. याच मुहूर्तापासून ‘दिव्य मराठी डॉट कॉम’ आपल्या वाचकांसाठी खास सादर करीत आहे कुंभपर्व २०१५ . कुंभमेळ्यातील राेचक घडामाेडी-माहिती, आकर्षक छायाचित्रे, गमती-जमतीची यात्रा वाचकांना ‘थेट साधुग्राम’मधून घडवून आणली जाईल. ‘साधुवाणी’तून कानी येतील संत-महंतांचे बाेल. ‘काय म्हणताे साेशल मीडिया’ तेही कळेल आणि जाणून घेता येईल ‘तीर्थमहात्म्य’.आणखी बरंच काही... दरराेज अवश्य वाचा ‘कुंभपर्व २०१५’.

दर बारा वर्षांनी भरणार्‍या कुंभमेळ्याचा शुभारंभ मंगळवारी सकाळी ध्वजाराेहण साेहळ्याने हाेणार आहे.मंगळवारी सकाळी 6 वाजून १६ मिनिटांनी नाशकात तर त्र्यंबकमध्ये 6 वाजून ३० मिनिटांनी ध्वजाराेहण साेहळा हाेणार आहे. या साेहळ्यानेच कुंभपर्वाचा प्रारंभ हाेत असल्याचे मानले जाते. दर बारा वर्षांनी हा साेहळा त्र्यंबक आणि नाशिकमध्ये हाेत असल्याने दाेन्ही ठिकाणच्या स्थानिक पुराेहीत संघांकडूनही या साेहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

पुढे जाणून घ्या,
ध्वजपर्वाचा इतिहास..
बडाेद्यात तयार झाला त्र्यंबकचा ध्वज...
नाशकातील धर्मध्वज केशरी रंगात...
स्नानासह गाेदापूजनाचे महत्त्व...
12 वर्षांनंतर उघडणार गंगा मंदिर...
काेणत्याही निमंत्रणाविना भरताे कुंभमेळा...