आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागा साधू बनण्याची प्रक्रिया चालते 12 वर्षे, जिवंतपणी करावे लागते पिंडदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातील नाशिक येथे यंदा सिंहस्थ महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले असून पुढील वर्षी 2016 मध्ये मध्यप्रदेशातील उज्जैन नगरीत (24 एप्रिल ते 24 मे) सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. यात सुमारे 50 हजार नागा संन्यासी सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यांत नागा साधुंना महत्त्व असते. कुंभमेळ्यांचे ते आकर्षण असतात. नागा साधूंना या काळात विशेष महत्त्व असते. नागा संन्यासी कोण असतात? ते नागा साधू कसे बनतात? ते कुठून येतात? तसेस नागा संन्यासी बनण्यासाठी त्यांना कोणत्या परीक्षेतून जावे लागते? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे आम्ही आपल्याला या पॅकेजमधून देणार आहोत.

सिंहस्थ काळात धार्मिक विधी संपन्न कराणारे जूना आखाडाचे पंडित शैलेंद्र वधेका आणि नरेंद्र गिरी महाराज यांनी सांगितले की, नागा साधु बनण्यासाठी कठोर तप करावे लागते. मोठ्या कसोटीतून जावे लागते. लष्करातील कमांडोंना दिल्या जाणार्‍या प्रशिक्षणापेक्षाही नागा साधूंना दिले जाणारे प्रशिक्षण कठीण असते. दीक्षा घेण्यापूर्वीच त्यांना स्वत:चे पिंडदान आणि श्राद्ध तर्पण करावे लागते.

पूर्वी मठाच्या सुरक्षितेसाठी नागा साधु तैनात केले जात असत. त्यासाठी त्यांना एका योद्धाप्रमाणे प्रशिक्षण दिले जात असे. पूर्वी मठ आणि मंदिरांच्या संरक्षेची जबाबदारी नागा साधुंकडे होती, असा इतिहासात उल्लेख आढळतो.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, नागा साधू बनण्याची संपूर्ण प्रक्रिया...