आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीर्थटनासह पर्यटन: ब्रह्मगिरीच्या नयनरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळात 'पद्मपूर' म्हणजे कमळाचे आणि 'गुलशनाबाद' म्हणजे फुलांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरासह जिल्ह्याला मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. देऊळांचं शहर म्हणूनही नाशिकची ओळख आहे. उल्लेखनीय म्हणजे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात त्र्यंबकेश्वर मंदिर वसलेले आहे. दक्षिणेतील गंगा म्हणून ज्या नदीचा उल्लेख केला जातो ती गोदावरी नदी येथेच उगम पावते. मंदिर उत्कृष्ट शिल्प व स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये विविध पर्यटन स्थळेही असल्यामुळे भाविकांना त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाबरोबरच पर्यटनाचाही अनुभव येतो.

नाशिकपासून अवघ्या 36 किलोमीटर अंतरावर ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी हे स्थान आहे. मंदिराचे बांधकाम इ. स. 1755 साली पेशवे बाळाजी बाजीरावांनी केल्याचा उल्लेख आढळतो. दर 12 वर्षांनी नाशिकबरोबर त्र्यंबकेश्वरलाही कुंभमेळा भरतो. त्याचबरोबर निवृत्तीनाथांची यात्रा, त्र्यंबकेश्वराची रथयात्रा आदी महत्त्वाच्या यात्रा या ठिकाणी भरतात. त्रिपिंडी, नारायण नागबळीचा विधी भारतात फक्त याच ठिकाणी होतो. कुशावर्त तीर्थ, गंगाद्वार व मुक्ताई मंदिर, संत ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ यांचे समाधी मंदिर इत्यादी महत्त्वाची स्थाने त्र्यंबकेश्वरपासून जवळच्या अंतरावर आहेत.

ब्रह्मगिरी पर्वताच्या नयनरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, पुराणात एक आख्यायिका....