शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवसाची प्रमुख देवी स्कंदमाता आहे. स्कंदमाता भक्तांना सुख-शांती प्रदान करणारी देवी आहे. देवासुर संग्रामाचे सेनापती भगवान स्कंदची आई असल्यामुळे देवी दुर्गच्या पाचव्या स्वरूपाला स्कंदमाता नावाने ओळखले जाते.
पूजन विधी -
सर्वात पहिले चौरंगावर किंवा पाटावर स्कंदमाता देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. चौरंगावर चांदी, तांबे किंवा मातीचा कलश स्थापन करून त्यामध्ये पाणी भरून त्यावर नारळ ठेवा. त्यानंतर चौरंगावर श्रीगणेश, वरुण, नवग्रह, षोडश मातृका (16 देवी) ची स्थापना करावी. त्यानंतर व्रत, पूजांचा संकल्प घ्यावा.
वैदिक आणि सप्तशती मंत्राचा उच्चार करून स्कंदमातासहित सर्व स्थापित देवतांची षोडशोपचार पूजा करावी. यामध्ये आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, सौभाग्य सूत्र, चंदन, रांगोळी, हळद, शेंदूर, दुर्वा, बिल्वपत्र, दागिने, फुलं-हार, सुगंधित द्रव्य, धूप-दीप, नैवेद्य, फळ, पान, दक्षिणा, आरती, प्रदक्षिणा, मंत्र पुष्पांजलि इ. गोष्टी कराव्यात.
ध्यान मंत्र -
सिंहासनगता नित्यं पद्माञ्चितकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी॥
अर्थ -
या देवीने देवांचा शत्रू तारकासुराचा वध केला होता. कार्तिकेयाची आई असल्यामुळे स्कंदमाता नावाने प्रसिद्ध आहे. या चतुभरुज देवीच्या उजव्या हाताने कार्तिकेयाला मांडीवर बसवलेले आहे, तर दुसर्या हातात कमळपुष्प आहे. डाव्या एका हाताची वरमुद्रा, तर दुसर्या हातात नीलकमल आहे. सोन्याचे कर्ण आभूषण व मुकुट आहे.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या देवीचे महत्त्व...