रामकथा सिरीजमध्ये आतापर्यंत तुम्ही वाचले की, जनकपुरीत श्रीरामाने सीता स्वयंवरात शिवधनुष्य तोडले. तेवढ्यात तेथे परशुराम आले आणि शिवधनुष्य तुटलेले पाहून त्यांना खूप राग आला. परंतु श्रीरामाचे स्वरूप जाणून घेतल्यानंतर ते पुन्हा वनात निघून गेले. राजा जनकाने दशरथ राजाला बोलावून श्रीराम आणि देवी सीतेचे लग्न लावून दिले. त्याचबरोबर भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचेही आपल्या भावाच्या मुलींसोबत लग्न लावले.
रामकथेमध्ये पुढे वाचा, राजा दशरथ श्रीरामाचा राज्याभिषेक करणार असल्याचे देवतांना समजल्यानंतर ते विचार करू लागले की, असे झाल्यास राक्षसांचा संहार कोण करणार? तेव्हा त्यांनी देवी सरस्वतीला एखादा उपाय करण्याची विनंती केली.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, त्यानंतर देवी सरस्वतीने काय केले, ज्यामुळे श्रीरामाला चौदा वर्ष वनवासात जावे लागले...