आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Navratri Know Installation Method, Auspicious Time, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवरात्री : जाणून घ्या, घटस्थापना विधी, शुभ मुहूर्त आणि खास गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदी शक्तीच्या उपासनेचा विशेष काळ नवरात्री उद्या (25 सप्टेंबर, गुरुवार) पासून सुरु होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घट स्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. येथे जाणून घ्या, देवीची घटस्थापना विधी आणि शुभ मुहूर्त....

घटस्थापना विधी
घटस्थापनेसाठी लागणारे पूजेचे साहित्य - नवरात्रोत्सवात शेतातील काळी माती, एक पत्रावळ, पाच प्रकारचे धान्य यामध्ये गहू, साळी, इतर कडधान्य इ., कुंभ कलश, विड्याची पाने, सुपारी, छोटी नाणी, कलशाला बांधण्यासाठी दोरा, धूप-दीप, गुगुळ, कुंकू, हळद, अक्षता, गुलाल इत्यादी पूजेचे साहित्य आवश्यक असते.

अमावस्येच्या दिवशी सर्व पूजासामग्री जमवावी. एकाच वेळी भोजन करावे. घटस्थापनेसाठी स्वच्छ जागेची निवड करावी. प्रतिपदेला सकाळी लवकर उठून नदी, तलाव, विहीर किंवा सोईस्कर ठिकाणी स्नान करावे. चौरंग किंवा पाटावर देवीची प्रतिमा स्थापन करून रत्नभूषण, मुक्ताहराने सुशोभित करावी. फोटो नसल्यास दुर्गायंत्राची स्थापना करावी. त्यासमोर पवित्र ठिकाणची किंवा शेतातील माती आणून वेदी (वेदी म्हणजे शेत) तयार करून त्यामध्ये पाच प्रकारचे धान्य पेरावेत. पीठ पूजेकरिता चौरंगाच्या दक्षिणेला कलश ठेवावा. त्यामध्ये तीर्थ-जल ठेवावे. एखादे रत्न किंवा सुवर्णही त्यात ठेवावे.

पूजा झाल्यानंतर देवीसमोर गायन-वादन करावे. विधिवत मंत्रोच्चाराबरोबर पूजन करावे. उत्सवात जमिनीवर झोपावे. कुमारिकांचे पूजन करावे. एक किंवा दोन वर्षाची कन्या कुमारिका, तीन वर्षांची कालिका, सात वर्षांची चंडिका, आठ वर्षांची शांभवी, नऊ वर्षांची दुर्गा आणि दहा वर्षांची सुभद्रा मानली जाते. दहा वर्र्षांपुढील कन्येला पूजनासाठी वज्र्य मानले आहे. नऊ दिवस उपवास करणे शक्य नसल्यास तीन दिवस उपवास करावा. भक्तिभावाने सप्तमी, अष्टमी आणि नवमीच्या रात्री भगवती पूजन केल्याने सर्व चांगले फळ मिळतात. (माहिती : श्रीदेवी भागवत पुराण पुस्तकातून साभार)
घटस्थापनेचे शुभ मुहूर्त
सकाळी 06:19 पासून 07:47 पर्यंत - शुभ
दुपारी 12:11 पासून 01:28 पर्यंत - लाभ
दुपारी 01:28 पासून 3:17 पर्यंत - अमृत
संध्याकाळी 04:45 पासून 06:13 पर्यंत - शुभ

घटस्थापना करताना काही वास्तू नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वास्तू नियम जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...