आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Navratri Loard Durga Worship Information In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवरात्री 25 पासून, या 9 दिवसांमध्ये करा शक्तीची उपासना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये अश्विन मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत नवरात्रीच्या उत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गाची विविध स्वरुपात पूजा केली जाते. प्रत्येक तिथीचे एक विशेष महत्त्व असते. हा काळ सिद्धी प्राप्त करण्यासाठी योग्य मानण्यात आला आहे. या वर्षी हा उत्सव 25 सप्टेंबर, गुरुवारपासून सुरु होऊन 3 ऑक्टोबर शुक्रवारपर्यंत साजरा केला जाईल.

धर्म ग्रंथानुसार या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. या उत्सवामध्ये देवीच्या प्रमुख मंदिरांमध्ये भक्तांची अलोट गर्दी गोळा होते. नगरातील प्रमुख ठिकाणांवर देवची स्थापना केली जाते. देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. कोणी नऊ दिवसांचे उपवास करतात तर कोणी नऊ दिवस चप्पल घालत नाहीत. विविध ठिकाणी गरबा आयोगाजन केले जाते.

दुर्गा देवीने विविध अवतार घेऊन शुंभ-निशुंभ, महिषासुर इत्यादी राक्षसांशी नऊ दिवस युद्ध केले व त्यांचा वध केला. म्हणून हा नवरात्राचा उत्सव केला जातो. विजयादशमी (दसरा) हा तिच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.