आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navratri Third Day Do Worship Of Goddess Chandragnta

नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी करा चंद्रघंटा देवीची पूजा, मिळेल मुक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. या देवीच्या डोक्यावर घंटेच्या आकाराचा देदीप्यमान चंद्र विराजमान आहे. यामुळे या देवीला चंद्रघंटा म्हणतात. ही देवी दशभुजा आहे. देवीच्या उजव्या चारपैकी एका हाताची अभयमुद्रा, तर उर्वरित तीन हातांत धनुष्य, बाण आणि कमळपुष्प आहे. पाचवा हात गळ्यातील माळेवर आहे. तिच्या डाव्या हातांमध्ये कमंडलू, वायुमुद्रा, खङ्ग, गदा आणि त्रिशूल आहे. गळ्यामध्ये फुलांचा हार, कानात सोन्याचे आभूषण, डोक्यावर मुकुट, वाहन सिंह आहे. ही देवी दुष्टांचा नाश करून भक्तांचे रक्षण करणारी आहे. त्यामुळे या देवीची उपासना करणारा पराक्रमी, निर्भय होतो. भक्ती व मुक्ती मिळवण्यासाठी या देवीची पूजा केली जाते.
ध्यान मंत्र
पिण्डजप्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकैर्युता।
प्रसादं तनुते मह्रयं चन्द्रघण्टेति विश्रुता॥
आपल्याला शिकायला हवे
निरोगी राहणे : मातेची सोन्यासारखी चकाकणारी कांती चांगल्या आरोग्याचे प्रतीक आहे. आरोग्याची काळजी घेऊनच आपण सुखी होऊ शकतो, हे शिकायला हवे.
कौशल्य विकास : मातेच्या दहा हातांमध्ये विविध अस्त्रे आहेत. आपणही अधिकाधिक कौशल्ये विकसित करून स्वत:ला अधिक मौल्यवान बनवू शकतो.
सद्भाव : मातेच्या मस्तकावरील अर्धचंद्र संदेश देतो की, व्यक्तीने आपले डोके नेहमी शांत ठेवावे. दुसर्‍यांविषयी सद्भावना असावी.