आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nepal Earthquake: Pashupatinath Temple Remains Unharmed

या कारणांमुळे विध्वंसानंतरही सुरक्षित राहिले हे २ प्राचीन मंदिर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
25 एप्रिल 2015 शनिवारी भारताच्या सीमेवरील देश नेपाळमध्ये मोठा भूकंप आला आणि एका क्षणातच काठमांडू आणि जवळपासचा परिसर उद्‍धवस्त झाला. या भूकंपामध्ये मोठ-मोठ्या इमारती कोसळल्या परंतु येथील प्राचीन पशुपतीनाथ मंदिराचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. यापूर्वी जून 2013 मध्ये भारतातील केदारनाथ क्षेत्र ढगफुटी झाल्यामुळे उद्‍धवस्त झाले होते, परंतु येथील केदारनाथ मंदिरही सुरक्षित होते. हे दोन्ही मंदिरे महादेवाचे असून या दोन्ही नैसर्गिक संकटावर मात करून सुरक्षित उभे आहेत. अशावेळी मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की, एवढ्या मोठ्या नैसर्गिक संकटातून ही दोन मंदिरे सुरक्षित कशी राहिली? येथे जाणून घ्या, या चमत्कारामागे कोणकोणती कारणे असू शकतात...

वैदिक पद्धतीने करण्यात आले होते महादेव मंदिरांचे निर्माण -
प्राचीन काळी मंदिरांचे निर्माण अशा ठिकाणी जेथे जात होते, जेथे पृथ्वीचे चुंबकीय तरंग योग्य प्रमाणात असतील. तसेच मंदिराचे स्थान आणि तेथे निर्माण होणार्‍या निसर्गिक संकटांवर विचार केला जात होता. एखादे नैसर्गिक संकट आले तरी, त्याचा प्रभाव ज्या ठिकाणी सर्वात कमी असेल तेथे मंदिर बांधले जात होते. प्राचीन शिव मंदिरांमध्ये शिवलिंग अशा ठकाणी स्थापित केले जात होते, जेथे चुंबकीय तरंगांचे नाभिकीय क्षेत्र विद्यमान असेल. शिवलिंग स्थापनेच्या वेळी मंदिरचा गाभारा आणि शिवलिंग एकसमान रेषेत स्थापन केले जात होते. प्राचीन मान्यतेनुसार हे ज्ञान महादेवानेच दिले आहे. जे भूतत्त्व विज्ञान नावाने ओळखले जाते.

वास्तू नियमांचे काटेकोर पालन -
मंदिर बांधताना वास्तू नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात होते. वास्तूशास्त्रामध्ये सर्व प्रकरचे संकट आणि दोषांपासून दूर राहण्याचे नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास इमारत सर्व संकटांमधून सुरक्षित राहू शकते. वास्तुनुसार पशुपतीनाथ मंदिरात एक मीटर उंच चौमुखी शिवलिंग स्थापित आहे. प्रत्येक मुखाकृतीच्या उजव्या हातामध्ये रुद्राक्षाची माळ आणि डाव्या हातामध्ये कमंडलू आहे. शिवलिंगाच्या चारही मुखांचे वेगवेगळे महत्त्व आहे. दक्षिण मुखाला अघोर, पूर्व मुखाला तत्पुरुष, उत्तर मुखाला अर्धनारीश्वर किंवा वामदेव आणि पश्चीम मुखाला साध्योजटा म्हटले जाते. या शिवलिंगाचा वरील भाग निराकार मुखाला ईशान्य म्हणतात.

केदारनाथ आणि पशुपतीनाथ संबंध -
स्कांद्पुरणात सांगितल्याप्रमाणे केदारनाथ आणि पशुपतीनाथ मंदिर एकमेकांच्या मुख आणि शेपटीशी जोडलेले आहेत. या दोन्ही मंदिरांचे बांधकाम करताना वास्तू ज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. सर्व महादेव मंदिरांमध्ये शिवलिंग जेवढे जमिनीच्या वर असते तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त जमिनीच्या खाली असते. येथे विज्ञानाच्या एका सिद्धांताचा वापर केला जातो, यालाच सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण केंद्र म्हटले जाते. विज्ञानाचा हा सिद्धांत वास्तूशास्त्रामध्ये सांगण्यात आला आहे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही रोचक गोष्टी...