आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळच्या या प्राचीन नदीमधील दगडांची केली जाते पूजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या सीमेवरील नेपाळ एक सुंदर देश आहे. येथील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरासुद्धा भारताशी मिळत्याजुळत्या आहेत. यामागचे कारण असे आहे की, नेपाळ मूळतः प्राचीन भारताचा एक भाग आहे. काळानुसार नेपाळ एक स्वतंत्र देश रुपात स्थापित झाला, परंतु येथे प्रत्येक ठिकाणी भारतीय संस्कृतीची झलक पाहण्यास मिळते. येथील अनेक ठिकाणांचे वर्णन हिंदू धर्म ग्रंथांमध्ये आढळून येते. नेपाळमधील गंडकी नदी यामधीलच एक आहे.

तुळस झाली गंडकी नदी
शिवपुराणानुसार, प्राचीन काळी शंखचूड नावाचा एक राक्षस होता. त्याची पत्नी तुळसी खूप तेजस्वी आणि सुंदर होती. ती पतिव्रता असल्याने शंखचूड याचा वध करणे अशक्य बनले होते. जेव्हा शंखचूड याचे भगवान महादेवाशी युद्ध सुरू झाले, त्यावेळी भगवान विष्णूंनी शंखचुडाचे रूप धारण केले आणि तुळशीचे पतिव्रत भंग केले. यामुळे शंखचुडाचा वध करणे शक्य झाले. तुळशीला हे समजले तेव्हा तिने भगवान विष्णूंना दगड बनण्याचा शाप दिला. विष्णूंनी हा शाप स्वीकारला आणि सांगितले की, पृथ्वीवर तू गंडकी नदी आणि तुळशीचे रोपटे स्वरुपात राहशील.

पुढे जाणून घ्या, गंडकी नदीशी संबंधित इतर काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...