आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्जला एकादशी आज : 23 एकादशींचे पुण्य मिळते या व्रतामुळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक वर्षात 24 एकादशी येतात. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षात येणा-या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. यंदा ही एकादशी 29 मे रोजी आहे. पुराणांनुसार निर्जला एकादशीचे व्रत केल्यास वर्षभरातील सर्व एकादशी व्रतांचे पुण्य मिळते.

असे करा व्रत
पहाटे लवकर उठून विष्णूची पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ जप करावा. सायंकाळी पूजा करावी, रात्री भजन-कीर्तन करून जमिनीवर झोपावे. दुस-या दिवशी योग्य ब्राह्मणास जेवू घालावे व पाण्याने भरलेला कलश पांढरे वस्त्र झाकून त्यावर साखर व दक्षिणा ठेवून दान करावा. त्यानंतर यशाशक्ती अन्न, वस्त्र, आसन, पादत्राणे, छत्री, पंखा तसेच फळे दान करावी. शेवटी स्वत: भोजन करावे.

एवं य: कुरुते पूर्णा द्वादशीं पापनासिनीम् ।
सर्वपापविनिर्मुक्त: पदं गच्छन्त्यनामयम् ॥
अशा प्रकारे जो व्यक्ती या पवित्र एकादशीचे व्रत करतो, त्याला सर्व पापातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, निर्जला एकादशीची कथा...
बातम्या आणखी आहेत...