आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृसिंह जयंती आज : जाणून घ्या, पूजन विधी आणि रोचक कथा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैशाख मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला नृसिंह जयंती साजरी केली जाते. धर्म ग्रंथानुसार या तिथीला भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार घेऊन दैत्यांचा राजा हिरण्यकश्यपूचा वध केला होता. या वर्षी ही जयंती 2 मे, शनिवारी आहे. या दिवशी नृसिंह देवाला प्रसन्न करण्यासाठी व्रत-पूजन केले जाते. येथे जाणून घ्या, व्रत व पूजन विधी.

नृसिंह चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म पूर्ण करून व्रत करण्याचा संकल्प घ्यावा. त्यानंतर दुपारी नदी, तलावावर किंवा घरातच वैदिक मंत्राचा उच्चार करून स्नान करावे. त्यानंतर पुजेची जागा शेणाने सारवून त्यावर अष्टदल कमळ काढावे.

कमळावर तांब्याचा कलश स्थापन करून त्यावर तांदळाने भरलेली प्लेट ठेवा. त्यानंतर तांदळाने भरलेल्या प्लेटवर लक्ष्मीसहित भगवान नृसिंहची मूर्ती स्थापन करा. (मूर्ती नसल्यास फोटो ठेवू शकता) त्यानंतर दोन्ही मूर्तींना पंचामृताने अभिषेक करा. योग्य विद्वान, पुरोहिताला आमंत्रित करून नृसिंह देवाचे पूजन करा. त्यानंतर आरती करून खालील मंत्राचा उच्चार करीत नैवेद्य दाखवावा.

नैवेद्यं शर्करां चापि भक्ष्यभोज्यसमन्वितम्।
ददामि ते रमाकांत सर्वपापक्षयं कुरु।।
(पद्मपुराण, उत्तरखंड 170/62)

पूजा झाल्यानंतर नृसिंह देवाकडे सुख-शांतीसाठी प्रार्थना करावा. रात्री जागरण करावे तसेच नृसिंह देवाची कथा ऐकावी.

भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार का घेतला, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...