आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nvratri Do Skandmata Worship On Wednesday, Is The Absolute Law

नवरात्रीतील आजच्या दिवशी करा स्कंदमातेची पूजा, जाणून घ्या मंत्र व महत्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्राच्या पाचव्या दिवशी पूजल्या जाणार्‍या या देवीने देवांचा शत्रू तारकासुराचा वध केला होता. काíतकेयाची आई असल्यामुळे स्कंदमाता नावाने प्रसिद्ध आहे. या चतुभरुज देवीच्या उजव्या हाताने काíतकेयाला मांडीवर बसवलेले आहे, तर दुसर्‍या हातात कमळपुष्प आहे. डाव्या एका हाताची वरमुद्रा, तर दुसर्‍या हातात नीलकमल आहे. सोन्याचे कर्ण आभूषण व मुकुट आहे. वाहन सिंह आहे. देवीच्या उपासनेचे फळ सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात आणि मोक्षप्राप्ती होते.

आजचा नैवेद्य : केळी.
याचे फळ : सर्व सिद्धी प्राप्त होतात.
कुमारिका पूजनाचे फळ : विद्याप्राप्ती.
अर्पणद्रव्य : अलंकार, उटणे, चंदन इ.
आजचा रंग : राखाडी (ग्रे)