आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपावली 11 ला, लक्ष्मी पूजेमध्ये ही 7 कामे करायला विसरू नका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
11 नोव्हेंबरला दिवाळी असून या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाईल. पूजा करताना छोट्या-छोट्या, परंतु महत्त्वपूर्ण परंपरांचे पालन केले जाते. उदाहरणार्थ मनगटावर लाल दोरा बांधणे, अक्षता टाकणे, टिळा लावणे, टिळा लावताना डोक्यावर हात किंवा रुमाल ठेवणे, कापूर लावून आरती करणे. येथे जाणून घ्या, या परंपरांचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

पूजा करतना मनगटावर लाल दोरा (गंडा) बांधा
हिंदू धर्मात पूजा, यज्ञ, हवन करताना ब्राम्‍हण आपल्‍या हातात लाल धागा बांधतात. हा धागा बांधल्‍याने त्रिदेव म्‍हणजे ब्रह्मा, विष्‍णु, महेश त्‍याचबरोबर तीन देवी- लक्ष्‍मी, पार्वती आणि सरस्‍वतीची कृपा प्राप्‍त होते. ब्रह्माच्‍या कृपेने कीर्ती, विष्‍णुच्‍या कृपेने ताकद आणि महादेवाच्‍या कृपेने दुर्गुणांचा विनाश होतो. त्‍याचप्रमाणे लक्ष्‍मीकडून धन, दुर्गेपासून शक्ति आणि सरस्‍वतीपासून बुद्धी प्राप्‍त होते.

शरीर विज्ञानाच्‍या दृष्‍टीने पाहिल्‍यास हातात धागा बांधल्‍याने उत्तम आरोग्‍य प्राप्‍त होते. शरीराचे त्रिदोष म्‍हणजे वात, पित्त आणि कफावर नियंत्रण मिळवता येते. हातात सर्वप्रथम धागा दानवीर राजा बळीच्‍या अमरतेसाठी वामन भगवानने त्‍यांच्‍या मनगटावर हे रक्षा सूत्र बांधले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...