उज्जैन (मध्य प्रदेश)- श्रावण-भाद्रपद महिन्यात निघणारी ज्योतिर्लिंग महाकाल यांची शाही सवारी मोठ्या थाटामाटात काढण्यात आली. महाकालेश्वर मंदिरातून सायंकाळी 4 वाजता सवारी सुरु झाली. यावेळी रस्त्यांवर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनीही सवारीला सलामी दिली.
राजाधिराज महाकाल यांच्या स्वागसाठी संपूर्ण मार्ग अगदी नववधूसारखा सजवण्यात आला होता. परंपरेनुसार सिंधिया स्टेटच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी महाकाल रुपातील श्री चंद्रमौलेश्वर यांच्या मुखवट्याची पूजा केली. पालखी उठण्याच्या आदल्या रात्री ही पूजा करण्यात आली. दुसऱ्या दिवसी दुपारी 3 वाजता पंरपरेनुसार संभागायुक्त डॉ. रविंद्र पस्तोर यांनी पूजा केली. त्यानंतर चार वाजता पालखी काढण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. देशविदेशातील भाविक या पालखीत सहभागी झाले होते. या सोहळ्यानिमित्त शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात आले होते.
पुढील स्लाईडवर बघा, या पालखीचे आणि महाकाल यांचे फोटो....