आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंड : केवळ केदारनाथच नाही, या 'पंच केदार'चेही घ्या दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तराखंडाचे हिंदू संस्कृतीमध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे. येथे गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ यासारखे अनेक तिर्थ क्षेत्र आहेत. जगामध्ये महादेवाचे असंख्य मंदीर आहे परंतु उत्तराखंडातील पाच मंदीरे सर्वोत्तम आहेत. महादेवाने आपल्या महिषरुप अवतारामध्ये आपले पाच अंग विविध स्थानांवर स्थापन केले होते. त्यांना मुख्य केदारनाथ पीठाच्या अतिरिक्त चार आणि पीठांसहीत पंच केदार म्हटले जाते.
पंज केदार तीर्थ
1. केदारनाथ
2. मध्यमेश्र्वर
3. तुंगनाथ
4. रुद्रनाथ
5. कल्पेश्वर
1. केदारनाथ
हे मुख्य केदार पीठ आहे. याला पंच केदारमध्ये प्रथम म्हटले जाते. पुराणांनुसार महाभारताचे युध्द संपल्यावर, आपल्याच कुळातील लोकांचा वध केल्याच्या पापांचे प्रायच्छित्त करण्यासाठी वेदव्यासजींच्या आज्ञे मुळे पांडवांनी येथे भगवान शिवची उपासना केली होती. तेव्हा भगवान शिवने खुश होऊन महिष म्हणचेच बैलाच्या रुपात दर्शन दिले होते. आणित्यांना पापांतुन मुक्त केले होते. तेव्हापासुन महिषरुपधारी भगवान शिवचा पृष्टभाग येथे शिलारुपात आहे.

केव्हा जावे
केदारनाथला जाण्यासाठी एप्रिल ते ऑक्टोबरची वेळ सर्वात चांगली आहे. याव्यतिरिक्त पावसाच्या दिवसांत येथे जाऊ नका.

केदारनाथजवळील ठिकाणे
उखीमठ - उखीमठ रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. हे स्थान समुद्र पातळीपासुन 1317 मी. उंचीवर आहे. येथे देवी उषा, महादेवाचे मंदिर आहे.

गंगोत्री ग्लेशियर - उत्तराखंडात असलेले गंगोत्री ग्लेशियर 28 कि. मी. लांब आणि 4 कि.मी रुंद आहे. गंगोत्री ग्लेशियर उत्तर पश्र्चिम दिशेमध्ये जास्त वाहते आणि एक गायीच्या मुखसमान स्थानावर वळण घेते.

पुढे जाणून घ्या, इतर 4 केदार तीर्थांची रोचक माहिती...