आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गुहेचे दुसरे टोक आजपर्यंत कोणीही पाहिले नाही, पांडव बाहेर निघत होते येथून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुहेचे प्रवेशद्वार - Divya Marathi
गुहेचे प्रवेशद्वार
हिमाचल प्रदेशामध्ये समुद्रसपाटीपासून जवळपास 25000 मीटर उंचीवर करोल पठाराजवळ एक गुहा आहे. पौराणिक कथेनुसार वनवास काळात पांडव येथे आले होते. ही गुहा येथून सुरु होऊन हरियाणाच्या कालका-पंचकुला येथे निघते. पांडव या गुहेचा उपयोग राहण्यासाठी आणि येण्याजाण्यासाठी करत होते. ही गुहा हरियाणाला हिमाचल प्रदेशशी जोडते. या पठारावर एक छोटेसे मंदिर आहे. या मंदिरामध्ये 2-3 देवाच्या मूर्ती आणि मध्यभागी हवन कुंड आहे. जवळच एक दोन खोल्यांची धर्मशाळा असून यामधील एका खोलीला कुलूप लावलेले आहे. उतरते छत आणि खिडकी नसलेली ही धर्मशाळा आहे.

या मंदिराच्या पाठीमागे दगडांखाली एक गुहा आहे. या गुहेला लोक पांडव गुहा नावाने ओळखतात. या गुहेमध्ये काळोख आहे. गुहेच्या आत जाताच काही अंतरावर खाली उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. गुहेमध्ये पाणी झिरपल्यामुळे घसरण निर्माण झालेली आहे. पाणी झिरपल्यामुळे गुहेमध्ये चित्र-विचित्र आकृत्या तयार झाल्या आहेत. काळोख आणि घसरण असल्यामुळे गुहेत लांबवर जाणे शक्य नाही. आजपर्यंत या गुहेला कोणीही पार करू शकले नाही. यामुळे ही गुहा एक रहस्य बनली आहे. या गुहेत आणखी काय-काय दडले आहे याची कोणालाही ठोस माहिती नाही.

पुढील स्लाईड्सवर पाहा पांडव गुहेचे इतर फोटो...