आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारकरी संप्रदायाचे लोकपीठ विठ्ठल मंदिर, मूर्तीचे खास वैशिष्ट्ये..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरातत्त्वाच्या प्रकाशात पंढरपूर वारकरी संप्रदायाचे लोकप्रिय पीठ असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल मंदिर आणि विठ्ठलाची मूर्ती कायम चर्चेत असते. दरवर्षी आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी आणि या न त्या निमित्ताने वारकरी नेहमीच तेथे पायधूळ झाडीत असतात. आराध्यदैवत विठ्ठलाचे दर्शन घेत असतात. कधी विठ्ठल मूर्तीची झीज झाली आहे, वज्रलेप लावला पाहिजे तर कधी शिलालेखांची झीज झाली आहे, त्याचे जतन केले पाहिजे अशा तऱ्हेचे विचार तज्ज्ञांकडून मांडले जात असतात.महाराष्ट्रातील आद्य मंदिरांच्या बांधणीचे अवशेष उस्मानाबाद जिल्ह्यात तेर आणि विदर्भात नागर व मांढळ येथे आढळतात. या मंदिराचा काळ उत्तर सातवाहन काळातील. इ.स. ५ ते ७ वे शतक असा. आजमितीला महाराष्ट्रातील सर्वात जुने मंदिर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे बांधले असल्याचे समजले जाते. हे शिवमंदिर शिलाहार राजा प्रतापादित्याने बांधले. ते यादव-शिलाहार या जोडनावाने ओळखले जाते. तेथील शिलालेखानुसार ते १०६० मध्ये बांधले गेले आहे. त्यानंतरच्याच काळात पंढरपूर व इतर अनेक मंदिरे बांधली गेली.

पुढे वाचा, मंदिर बांधणीची वैशिष्ट्ये...