Home | Jeevan Mantra | Dharm | Parampara Know The Saat Vachan Of Shad

वधू-वर लवकरच विसरतात विवाहातील सप्तपदीची वचने

धर्म डेस्क | Update - Jan 06, 2014, 09:56 AM IST

हिंदु धर्मशास्त्रात सोळा संस्कार सांगितले आहेत. त्यात विवाह हा सर्वात मोठा संस्कार आहे.

 • Parampara Know The Saat Vachan Of Shad
  हिंदु धर्मशास्त्रात सोळा संस्कार सांगितले आहेत. त्यात विवाह हा सर्वात मोठा संस्कार आहे. विवाह एक पवित्र संस्कार आहे. या संस्काराला अतिशय उदात्त आणि मंगल स्वरूप दिलेले आहे. अन्य धर्माचे विवाह हा एक करार समजला जातो. मात्र, हिंदुधर्मातील विवाह म्हणजे सातजन्माचे वचन असते. विवाह म्हणजे केवळ पवित्र भावनाच नाही तर सुरक्षितता, स्थेर्य प्राप्त होण्यासाठी तसेच वैवाहिक सुखी जीवनासाठी सुज्ञानी काही रीतीरिवाज, यम, नियमांचा, धर्मिकाचारणात समावेश केला.
  मात्र, बहुतेक लोक लग्नानंतर काही दिवसातच विवाह सोहळ्यातील महत्त्वाचा विधी विसरतात. अर्थात हा विधी म्हणजे सप्त वचने जे वधू-वर अग्नीला साक्षी माणून एकमेकांना देतात. आज आम्ही आपल्याला या काही खास विधीबाबत सांगणार आहे.
  हिंदू धर्मशास्त्रानुसार, विवाहात वर-वधू एकमेकांना सप्त वचने देतात. पुढील स्लाइडवर वाचा, नवरदेव नववधूला कोणती वचने देतो...

 • Parampara Know The Saat Vachan Of Shad
  पहिले वचन..
  तीर्थव्रतोद्यापनयज्ञ दानं मया सह त्वं यदि कान्तकुर्या:।
  वामांगमायामि तदा त्वदीयं जगाद वाक्यं प्रथमं कुमारी।
  या श्लोकानुसार नववधू वराला म्हणते, तीर्थ, व्रत, यज्ञ, उद्यापन, दान, इत्यादी शुभ कामे तू माझासोबत करशील तरच मी तुझी पत्नी बनण्यास तयार आहे
 • Parampara Know The Saat Vachan Of Shad

  दुसरे वचन...
  हव्यप्रदानैरमरान् पितृश्चं कव्यं प्रदानैर्यदि पूजयेथा:।
  वामांगमायामि तदा त्वदीयं जगाद कन्या वचनं द्वितीयकम्।।
  या श्लोकानुसार नववधू म्हणते, तू जर देवाला आणि पूर्वजांना वस्तू अपर्ण करणार असशील तरच मी तुझी पत्नी बनू शकते. 
 • Parampara Know The Saat Vachan Of Shad
  तिसरे वचन..
  कुटुम्बरक्षाभरंणं यदि त्वं कुर्या: पशूनां परिपालनं च।
  वामांगमायामि तदा त्वदीयं जगाद कन्या वचनं तृतीयम्।।
  या श्लोकानुसार नववधू म्हणते, तू जर माझी, कुटूंबाची रक्षा करशील आणि पाळीव प्रण्यांचा सांभाळ करणार असशील तरच मी तुझी पत्नी बनेल.

  पाचवे वचन...
  देवालयारामतडागकूपं वापी विदध्या:यदि पूजयेथा:।
  वामांगमायामि तदा त्वदीयं जगाद कन्या वचनं पंचमम्।।
  पाचव्या वचनात नववधु म्हणते, तू जर देऊळ, बाग, विहीर, तलाव बनवून त्याची पूजा करणार असशील तरच मी तुझी पत्नी बनू शकते.
 • Parampara Know The Saat Vachan Of Shad
  सहावे वचन...
  देशान्तरे वा स्वपुरान्तरे वा यदा विदध्या:क्रयविक्रये त्वम्।
  वामांगमायामि तदा त्वदीयं जगाद कन्या वचनं षष्ठम्।।
  या सहाव्या वचनात नववधू म्हणते, तू जर तुझ्या शहरात, परदेशात जाऊन व्यापार किंवा नोकरी करून कुटूंबाचा सांभाळ करणार असशील तरच मी तुझी पत्नी बनू शकते
 • Parampara Know The Saat Vachan Of Shad
  सातवे वचन...
  न सेवनीया परिकी यजाया त्वया भवेभाविनि कामनीश्च।
  वामांगमायामि तदा त्वदीयं जगाद कन्या वचनं सप्तम्।। 
  या शेवटच्या वचनात नववधू म्हणते, तु आयुष्यात कधाही परस्त्रीला स्पर्श करणार नसशील तरच मी तुझी पत्नी बनेल.
 • Parampara Know The Saat Vachan Of Shad
   
  हिंदू धर्मशास्त्रानुसार, पत्नीचे स्थान हे पतीच्या उजव्या हाताला असते. विवाहाच्या आधी नववधुला नवरदेवाच्या डाव्या हाताला बसवतात तर लग्नानंनतर जेव्हा ते पती-पत्नी बनतात तेव्हा तिला उजव्या हाताला बसवतात.

Trending