आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजेसाठी दिवा प्रज्‍वलीत करताना पाळा हे नियम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवी-देवतांची पूजा करताना आरतीचे विशेष महत्‍व आहे. आरती झाल्‍यानंतरच पूजा पूर्ण होते. पूजेमध्‍ये आरतील विशेष महत्‍व असल्‍यामुळे दिवा तयार करताना काही बाबींचा विचार करावा लागतो. विधि-विधानात दिलेल्‍या पद्धती नुसार दिवा तयार केला तर देवी-देवतांची कृपा लवकर प्राप्‍त होते.
दिव्‍याच्‍या संबंधीत काही महत्त्वाच्‍या गोष्‍टी
शास्‍त्रामध्‍ये आरती झाल्‍यानंतर देवी- देवतांसमोर दिवा कोणत्‍या बाजूला ठेवायचा याचे नियम सांगण्‍यात आले आहेत. तेलापासून दिवा तयार केला आसेल तर तो पूजेच्‍या डाव्‍या बाजूला मांडावा. 'तुपा' पासून तयार केलेला दिवा जिथे पूजा मांडण्‍यात आली आहे, त्‍याच्‍या उजव्‍या बाजूला मांडावा. पूजा करताना दिवा विझणार नाही याची काळजी घ्‍यावी. पूजा करताना दिवा विझला, तर मात्र पूजा यशस्‍वी होत नाही, केलेल्‍या पूजेचे फळ पूजा करणाराला मिळत नाही.
तुपाचा दिव्‍यासाठी कापसाची वात वापरावी. तेलाचा दिवा असेल तर लाल धागा वातिसाठी श्रेष्‍ठ मानला जातो. पूजेसाठी एकदा वापरलेली वात दुस-या पुजेला वापरू नये, तसे करणे शास्‍त्रामध्‍ये अशुभ मानले आहे.