आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या, रामायणातील 'सुंदरकांडाला' का आहे विशेष महत्त्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्‍याही शुभ कार्याची सुरूवात करण्‍याअगोदर तुलसीदास यांच्‍या श्रीरामचरितमानस सुंदरकांडचे पठन केले जाते. शुभकार्य सुरू करण्‍याअगोदर सुंदरकांड पारायण करण्‍याला हिंदू धर्मामध्‍ये विशेष महत्‍व आहे. जेव्‍हा- जेव्‍हा व्यक्तिगत आयुष्‍यात संकट येत असतील, कोणतेचे कार्य मार्गी लागत नसतील तर सुंदरकांडचे पठण केले जाते. वारंवार आडचणी आल्‍यामुळे आत्‍मविश्वास कमी होत असेल तर सुंदरकांडचे पठण केल्‍यानंतर शुभ फळाची प्राप्‍ती होते, असे शास्‍त्रामध्‍ये सांगण्‍यात आले आहे. सकंट काळात सुंदरकांडचे पठण करण्‍याचा सल्ला ज्‍योतिषी आणि संत देत असतात.
सुंदरकांडचे पठण्‍ा केल्‍यानंतर काय लाभ होतो
श्रीरामचतिरमानसच्‍या सुंदरकांडची कथा सर्वांत वेगळी आहे. या कथेत श्रीरामचंद्रांच्‍या गुणाचे आणि पुरूषार्थाचे वर्णन करण्‍यात आले आहे. श्रीरामचरितमानस मधील सुंदरकांड हा असा एकमेव अध्‍याय आहे, ज्‍यामध्‍ये श्रीरामभक्‍त हनुमान याने केलेले पराक्रम आणि कार्य याविषयीचे वर्णय करण्‍यात आले आहे. मानसोपचार तज्‍ज्ञांच्‍या दृष्‍टीकोणातून सुंदरकांड म्‍हणजे आत्‍मविश्वास आणि इच्‍छाशक्‍ती वाढवण्‍यासाठी मदत करते. सुंदरकांडचे पठण केल्‍यामुळे व्‍यक्तिला मानसिक शक्‍ती प्राप्‍त होते. कोणतेही कार्य करण्‍यासाठीचा आत्‍मविश्वास मिळतो असे सांगण्‍यात आले आहे.
श्रीहनुमान हे समुद्र पार करून लंकेत गेले आणि सीतेचा शोध लावला. लंका जाळली आणि सितेचा निरोप श्रीरामाला दिला. एका भक्‍ताच्‍या पराक्रमाचे वर्णन या अध्‍यायात करण्‍यात आले आहे. म्‍हणून या अध्‍यायाला सुंदरकांड म्‍हणून ओळखले जाते. इच्‍छाशक्‍तीच्‍या जोरावर सितेचा शोध लावणे. रावणाला रामाच्‍या शक्‍तीची जाणीव करून देण्‍याचे काम हनुमानाणे कशा पध्‍दतीने केले याचे वर्णय सुंदरकांडमध्‍ये करण्‍यात आले आहे. यामुळे पुर्ण रामायण ग्रंथामध्‍ये सुंदरकांडला विशेष महत्त्व आहे.
श्रीराम भक्‍त हनुमानाची पूजा केल्‍यानंतर सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे रामायणात सांगण्‍यात आले आहे. बजरंगबली सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवता म्‍हणून ओळखली जाते. श्रीहनुमानाची कृपा मिळवण्‍यासाठी शास्‍त्रामध्‍ये विविध उपाय सांगण्‍यात आले आहेत. या उपायांपैकी सुंदरकांडचे पठण हा सर्वात चांगला उपाय. यामुळे खूप लोक सुंदरकांडचे पठण नियमित करतात.
पुढील स्‍लाईडवर वाचा रामभक्‍त हनुमान पूजेचे काही नियम...