सध्या श्रावण मास चालू आहे. या महिन्यात शिवशंकर म्हणून ओळखल्या जाणा-या महादेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात हिंदू राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणा-या नेपाळमध्ये शिवशंकराची पूजा करण्यात येते. नेपाळमधील काठमांडूच्या पुर्वेचा भाग काष्ठ नदिच्या किणा-यावर शिववमंदिर वसलेले आहे. शिवमंदीर प्राचीन असल्यामुळे अनेक ग्रंथामध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी या मंदिराला भेट दिली.
लाकडापासून तयार केलेले मंदिर-
पशुपतिनाथ म्हणून ओळखळ्या जाणा-या मंदिराचा जास्तीत-जास्त भाग हा लाकडापासून तयार करण्यात आलेला आहे. मंदिराच्या गाभा-यात पंचमुखी शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे. या मंदिराच्या बाजुला श्रीगणेशचे एक मंदिर आहे.
पशुपतिनाथ शिवलिंग-
पंचमुखी शिवलिंग म्हणून पशुपतिनाथ मंदिराची ओळख आहे. या मुर्तिच्या उजव्या हातामध्ये रूद्राक्ष्ा माळ आणि डाव्या हातामध्ये कमंडल आहे. पंचमुखापैकी पहिल्या मुखाला अघोर मुख म्हटल्या जाते. दुसरे मुख तत्पुरूष मुख म्हणून ओळखले जाते. तत्पुरूष मुख पुर्व दिशेला आहे. उत्तर दिशेला अर्धनारीश्वर मुख आहे. पश्चिमेकडील मुखाला सद्योजात मुख म्हणून ओळखले जाते. वरच्या भागाला असलेल्या मुखाला ईशान मुख म्हणून ओळखले जाते. हे निरांकार मुख असल्यामुळे भगवान पशुपतिनाथचे सर्वात श्रेष्ठ मुख म्हटले जाते.विश्व सांस्कृतिक विरासत या ग्रथांमध्ये भगवान पशुपतिनाथ मंदिराचे संदर्भ आढळतात.
कांतिपूर ते काठमांडू-
प्राचीन काळामध्ये काठमांडू शहराला कांतिपूर या नावाने ओळखले जात होते. या शहरात बागमती आणि विष्णुमती नदीचा संगम आहे. या मंदिरातील डबंरू आणि त्रिशूल हे भक्तांसाठी आकृषण ठरतात. या मंदिराला चार दरवाजे आहे. चौकोणी आकाराच्या या मंदिरातून दक्षिणकडे असलेल्या भैरवाचे दर्शन घेता येते.
पुढील स्लाईडवर पाहा पशुपतिनाथ मंदिराची छायाचित्रे...