आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Myth : या गुहेत दडलेले आहेत अनेक रहस्य, ऐकू येतात गूढ आवाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील गंगोली-हाट भागातील पाताळ भुवनेश्वर गुहेविषयी स्कंद पुराणात सांगण्यात आले आहे की, येथे महादेवाचा निवास आहे. स्थानिक मान्यतेनुसार या गुहेतून गूढ आवाज येतात.

या गुहेत चार खांब असून यांना सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग म्हटले जाते. यामधील पहिल्या तीन खांबांच्या आकारामध्ये हजारो वर्षांपासून कोणताच बदल झालेला नाही. परंतु कलियुगाच्या खांबाविषयी येथील पुजारी सांगतात की, सात कोटी वर्षांपासून हे पिंड एक इंचाने वाढत आहे.

येथे जाणून घ्या, या रहस्यमयी गुहेविषयी...
- या खांबांच्या पलीकडे गुहेमध्ये असे ठिकाण आहे, जेथे महादेवाने श्रीगणेशाचे कापलेले शीर ठेवले आहे. संपूर्ण जगात हे एकमेव असे ठिकाण आहे, जेथे श्रीगणेशाची शीर नसलेली मूर्ती आहे. गणेश मूर्तीच्या ठीक वर 108 पाकळ्यांचे ब्रह्मकमळ असून यातून पाणी टपकत राहते.

- गुहेमध्ये नागाच्या आकृतीची एक मोठी शिळा आहे. असे मानले जाते की, राजा परीक्षितला मिळालेल्या शापातून मुक्ती देण्यासाठी त्यांचा मुलगा जन्मेजयने याच कुंडात सर्व नागांना जाळून भस्म केले होते. परंतु तक्षक नाग यातून वाचला आणि या नागाने परीक्षित राजाला यमसदनी पाठवले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, गुहेच्या आतील खास फोटो आणि वाचा रोचक माहिती...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...