Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | pitamah bhishma mistake in Mahabharata war

महाभारत युद्धाला कारणीभूत ठरली का 'भीष्म प्रतिज्ञा'? वाचा इतिहासातील रंजक गोष्टी

जीवनमंत्र डेस्क | Update - May 31, 2017, 09:36 AM IST

महात्मा भीष्म यांना महाभारताच्या महान योद्धांमधील एक मानले जाते. भीष्म परम प्रतापी आणि दृढ इच्छाशक्तीचे होते.

 • pitamah bhishma mistake in Mahabharata war
  महात्मा भीष्म यांना महाभारताच्या महान योद्धांमधील एक मानले जाते. भीष्म परम प्रतापी आणि दृढ इच्छाशक्तीचे होते. त्यांनी आपल्या वडिलांना वचन दिले होते आणि त्यामुळे आयुष्यभर अविवाहित राहिले. आज आम्ही तुम्हाला महाभारतातील या प्रमुख पात्राविषयी काही खास गोष्टी सांगत आहोत.

  पुढे वाचा, भीष्माच्या कोणत्या 11 चुकांमुळे घडले महाभारताचे महायुद्ध...

 • pitamah bhishma mistake in Mahabharata war
  अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा
  जेव्हा भीष्माचे वडील शांतनूने सत्यवतीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा सत्यवतीने आपल्या आपत्यांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली. तेव्हा भावूक झालेल्या भीष्म यांनी अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली, ज्यामुळे सत्यवतीच्या मुलांना हस्तिनापुरचे राज्य मिळू शकेल. हीच एक चूक होती, जर भीष्माने ही प्रतिज्ञा केली नसती तर भविष्यात राज्यासाठी एवढे दावेदार निर्माण झाले नसते.
 • pitamah bhishma mistake in Mahabharata war
  काशीच्या राजकुमारीचे अपहरण
  आपले सावत्र भाऊ म्हणजे सत्यवतीच्या मुलांसाठी भीष्म यांनी एवढे मोठे पाप केले. त्यांनी अंबा, अंबिका आणि अंबालिका नावाच्या राजाकुमारींचे अपहरण केले.
 • pitamah bhishma mistake in Mahabharata war
  अंबासोबत लग्न करण्यास नकार
  ज्या अंबाचे भीष्मांनी अपहरण केले होते, तिने भिष्मासोबतच लग्न करण्याचे ठरवले अन्यथा तिची बदनामी झाली असती. परंतु भीष्म यांनी अंबासोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे अंबाने प्रतिज्ञा केली की, पुढील जन्मात तीच भीष्म यांच्या मृत्यूचे कारण बनेल. महाभारत युद्धात शिखंडी भीष्माच्या मृत्यूचे कारण ठरला, वास्तवामध्ये ती अंबा होती.
 • pitamah bhishma mistake in Mahabharata war
  गांधारीचे धृतराष्ट्रसोबत लग्न
  गांधारी अंध नाही हे माहिती असूनही भीष्म यांनी गांधारीचे लग्न बळजबरीने धृतराष्ट्रसोबत लावून दिले. आपल्या बहिणीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या शकुनीने बहिणीसोबत झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आयुष्यभर नवनवीन कारस्थान रचले आणि ज्यामुळे महाभारत युद्ध झाले.
 • pitamah bhishma mistake in Mahabharata war
  शकुनीला हस्तिनापुरमध्ये राहण्याची परवानगी
  धृतराष्ट्र अंध असल्याचे समजल्यानंतर गांधारीनेसुद्धा डोळ्यांवर पट्टी बांधून राहण्याचे ठरवले. यामुळे शकुनीच्या मनात हस्तिनापुर साम्राज्याविषयी आणखीनच द्वेष निर्माण झाला. काही काळानंतर भीष्म यांनी शकुनीला राज्यात राहण्याची परवानगी दिली. याचे परिणाम नंतर काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे.
 • pitamah bhishma mistake in Mahabharata war
  धृतराष्ट्र यांचे डोळे झाकून समर्थन
  पुत्र मोहामुळे धृतराष्ट्र पांडवांसोबत अन्यान करत असल्याचे भीष्म यांना माहिती होते. परंतु राजा आणि सिंहासनबद्दल असलेल्या निष्ठेमुळे भीष्म त्यांच्यासोबतच राहिले. पांडवांवर झालेल्या अतिअन्यायामुळेच महाभारताचे युद्ध झाले.
 • pitamah bhishma mistake in Mahabharata war
  द्यूत क्रीडेला परवानगी
  राजभवनात कौरव आणि पांडवांमध्ये द्युतक्रिडा म्हणजे जुगार खेळण्याला परवनागी देणे हीसुद्धा भीष्म यांची एक मोठी चूक होती. भीष्म हा खेळ थांबवू शकत होते, ज्यामुळे पांडवांचे सर्वकाही नष्ट झाले.
 • pitamah bhishma mistake in Mahabharata war
  द्रौपदी वस्त्रहरण
  द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना भीष्म उघड्या डोळ्यांनी हा अन्यान फक्त बघत राहिले आणि यामुळे भगवान श्रीकृष्णाला महाभारत युद्धात कौरवांच्या विरुद्ध उभे राहण्याचा निर्णय घ्यावा लागला.
 • pitamah bhishma mistake in Mahabharata war
  कर्णाचे सत्य लपवणे
  पितामह भीष्म यांना माहिती होते की, कर्ण हा पांडवांचाच भाऊ आहे, परंतु त्यांनी हे सत्य सर्वांपासून लपवले. कर्णाचे हे सत्य लपवणेसुद्धा महाभारत युद्धाचे एक मोठे कारण ठरले.
 • pitamah bhishma mistake in Mahabharata war
  हस्तिनापुरचे विभाजन
  भीष्म राजसिंहासनाचे रक्षणकर्ते होण्याच्या नात्याने राज्याचे विभाजन रोखू शकले असते, परंतु त्यांनी असे केले नाही आणि याच विभाजनामुळे महाभारत युद्धाचे कारक बनले.

Trending