आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pitra Paksha 2015 Shraddhas Start On 28 September Monday

पितृपक्ष सुरु, आला पितरांना प्रसन्न करणारा पंधरवडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगानुसार भाद्रपद मासातील पौर्णिमेपासून अश्विन मासातील अमावस्या तिथीपर्यंतच्या काळाला पितृ व श्राद्ध पक्ष म्हणतात. या वर्षी श्राद्ध पक्ष 28 सप्टेंबर सोमवारपासून सुरु होत असून 12 ऑक्टोबर सोमवारपर्यंत राहील. सनातन धर्मामध्ये श्राद्धपक्षाचा काळ पूर्वजांना तृप्त करून त्यांच्याबद्दल आस्था प्रकट करण्यासाठी सांगण्यात आला आहे.

प्रत्येक धर्माचा आधार श्रद्धा आहे. सर्व धर्मांमध्ये पितरांबद्दल सन्मान आणि श्रद्धा भावनेचे महत्त्व सांगण्यात आले आहे. सनातन धर्मामध्ये श्रद्धा प्रकट करण्याचे एक धार्मिक कर्म श्राद्ध आहे. श्राद्धामध्ये आपण पूर्वजांना तृप करण्याचे कर्म करतो. आपल्या मृत पितृगण म्हणजे पितरांसाठी श्रद्धापूर्वक कर्म केल्यामुळे याला श्राद्ध नाव पडले. यालाच पितृयज्ञ असेही म्हणतात.

शास्त्रानुसार विभिन्न तिथीला करण्यात आलेल्या श्राद्धामुळे मिळणारे फळसुद्धा वेगवेगळे असते. शास्त्रामध्ये श्राद्धाला 'महालय' असेही म्हणतात. महाचा अर्थ 'उत्सवाचा दिवस' आणि आलय म्हणजे 'घर'. या कृष्ण पक्षामध्ये पितरांचा निवास मानला गेला असल्यामुळे या काळात पितरांच्या तृप्तीसाठी श्राद्ध केले जाते.