आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pitra Paksha 2015 These 25 Things Are Keep In Mind That You Should Shradha

25 गोष्टी, ज्या श्राद्ध करताना सर्वांनी अवश्य लक्षात ठेवाव्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथानुसार श्राद्धाच्या 16 दिवसांमध्ये लोक आपल्या पितरांना जल देतात तसेच त्यांच्या मृत्यू तिथीला श्राद्ध करतात. पितरांचे ऋण श्राद्धाच्या रुपात फेडले जाते अशी मान्यता आहे. वर्षातील कोणत्याही महिन्यात तसेच तिथीला स्वर्गवासी झालेल्या पितरांचे पितृपक्षात त्या तिथीला श्राद्ध केले जाते. श्राद्धाशी संबंधित अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या फार कमी लोकांना माहिती असाव्यात. परंतु या गोष्टी श्राद्ध करण्यापूर्वी जाणून घेणे आवश्यक आहेत, कारण अनेकवेळा विधीपूर्वक श्राद्ध न केल्यास पितर शाप देतात. आज आम्ही तुम्हाला श्राद्धाशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत.

1. श्राद्ध कर्मामध्ये गायीचे दुध, तूप, दह्याचा उपयोग करावा. हे लक्षात ठेवावे की, गाईला वासरू होऊन दहा दिवस झालेले असावेत. गाईने वासराला जन्म देऊन दहा दिवस झाले नसतील तर त्या दुधाचा श्राद्ध कर्मात उपयोग करू नये.
2. श्राद्धामध्ये चांदीच्या भांड्याचा उपयोग व दान पुण्यप्रद असण्यासोबतच राक्षसांचा नाश करणारा आहे. पितरांना चांदीच्या भांड्यातून जल अर्पण केल्यास ते अक्षय तृप्तीकारक राहते. पितरांसाठी अर्घ्य, पिंड आणि भोजनाचे पत्र चांदीचे असेल तर आणखी श्रेष्ठ मानले जाते.

श्राद्ध पक्षाशी संबंधित इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...