आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्राद्ध पक्षात खाऊ नये लसूण-कांदा, लक्षात ठेवा या गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
28 सप्टेंबर 2015 ते 12 ऑक्टोबर 2015 पर्यंत श्राद्ध पक्ष राहील. या दिवसांमध्ये करण्यात आलेल्या तर्पणामुळे पितर देवता तृप होतात आणि त्यांच्या कृपेने घर-कुटुंबात सुख-समृद्धी कायम राहते. श्राद्ध पक्षामध्ये शास्त्रानुसार आहार आणि दिनचर्येत काही बदल करणे आवश्यक आहेत. श्राद्ध काळात लसूण, गाजर, कांदा या सर्व गोष्टी वर्ज्य सांगण्यात आल्या आहेत.

का खाऊ नये लसूण आणि कांदा -
शास्त्रानुसार लसूण आणि कांदा तामसिक आहेत. तामसिक पदार्थ खाल्ल्याने आपल्या विचारांची पवित्रता नष्ट होते आणि स्वभावात क्रोध वाढतो. मन एकाग्र होऊ शकत नाही. श्राद्धाचा काळ पूजन आणि ध्यान करण्यासाठी श्रेष्ठ सांगण्यात आला असून या कार्मांसाठी मनाची एकग्रता आणि पवित्रता खूप आवश्यक आहे. यामुळे श्राद्ध काळात मनाची एकाग्रता भंग करणाऱ्या पदार्थांचे सेवन करू नये.

धार्मिक मान्यता -
जर एखाद्या व्यक्तीने श्राद्ध काळात वर्ज्य सांगण्यात आलेल्या पदार्थांचे सेवन केले तर पितर देवता रुष्ट होऊ शकतात. पितर देवता रुष्ट झाल्यास घरामध्ये सुख-समृद्धी राहत नाही. कुटुंबातील सदस्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. पितर देवतेच्या कृपेशिवाय इतर देवी-देवतांची कृपा प्राप्त केली जाऊ शकत नाही.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, श्राद्ध पक्षात इतर कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे...