आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज अशी आहे श्रीरामाची जन्मभूमी अयोध्या, पाहा फोटोज...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज श्रीरामाचा जन्म झाला होता. उत्तर प्रदेशच्या आयोध्यामध्ये राजा दशरथाच्या घरी विष्णुने राम अवतार घेतला होता. भगवान श्रीरामाचा जन्म उत्तर प्रदेशातील आयोध्यामध्ये झाला होता. आयोध्या प्रसिद्ध आणि पौराणिक शहरांमधील एक आहे. भगवान श्रीरामाचा जन्म सूर्यवंशात झाला होता. सूर्यवंशाच्या सर्व राजांची राजधानी आयोध्याच आहे. भगवान श्रीरामानेही अनेक वर्ष आयोध्येत राज्य केले.
असे सांगितले जाते की, आयोध्येवर मुघल बादशाह बाबरने आक्रमण करून येथील प्राचीन राम मंदिर पडून तेथे एक मशीद बांधली होती. त्यानंतर आयोध्येचे रूप पूर्णपणे बदलून गेले. आज आम्ही तुम्हाला सध्याची वर्तमानातील आयोध्या कशी आहे याविषयी माहिती देत आहोत. कसे आहे आयोध्येचे स्वरूप आणि आता येथे कोणकोणते मंदिर आहेत.
काही वर्षांपूर्वीच बांधण्यात आले आहे आजचे कनक भवन
सध्या जे कनक भवन आयोध्येत आहे, ते काही वर्षांपूर्वी ओरछाच्या राजाने बांधले आहे. स्थानिक मान्यतेनुसार येथे चार हजार वर्षांपूर्वी याच नावाचे एक मंदिर होते. कनक भवनाला भगवान श्रीरामाचे अंतपूर किंवा सीता महाल असेही म्हटले जाते. या मंदिरात श्रीराम-सीतेची संगमरवरी मूर्ती आहे. मोठ्या मूर्तीमागे सीता-रामाची छोटी मूर्ती असून ही मूर्ती हजारो वर्ष जुनी असल्याचे सांगितले जाते. कनक भवनाच्या दुसर्‍या मजल्यावर श्रीरामची अंतपुरी आहे. शेजारील खोलीत स्नान गृह आणि शृंगार गृह आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अयोध्ये संबंधीत इतर गोष्टी....