आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज बुधवारी अशी करा गणेश पूजा, संकटांपासून मिळेल मुक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवार हा गणेश पूजेचा विशेष दिवस असल्याचे हिंदू धर्मात सांगितले आहे. शिवाय बुध ग्रहानिमित्तही आज गणपतीची पूजा केली जाते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रहाची अशुभ स्थिती असेल तर बुधवारी अशी पूजा केली तर त्यापासून सुटका होऊ शकते.
श्रीगणेशाला शेंदुर, चंदन, यज्ञोपवीत, दूर्वा, लाडू किंवा गुळापासून तयार केलेल्या मिठाईचा प्रसाद द्या. धूप आणि दीवा लावून आरती करा. यावेळी पूजा करताना या मंत्राचा जप करा.
मंत्र- प्रातर्नमामि चतुराननवन्द्यमानमिच्छानुकूलमखिलं च वरं ददानम्।
तं तुन्दिलं द्विरसनाधिपयज्ञसूत्रं पुत्रं विलासचतुरं शिवयो: शिवाय।।
प्रातर्भजाम्यभयदं खलु भक्तशोकदावानलं गणविभुं वरकुञ्जरास्यम्।

अज्ञानकाननविनाशनहव्यवाहमुत्साहवर्धनमहं सुतमीश्वरस्य।।
या मंत्राचा अर्थ आहे, की स्वयं ब्रह्मदेवही करतात मी अशा देवाची पूजा करतो. मनातील इच्छा पूर्ण करणारा, भीती दूर करणारा, संकट दूर करणारा, गुणांचा नायक असा माझा देव आहे. त्याच्या पूजनाने माझी सर्व संकटे दूर होतील.
बातम्या आणखी आहेत...