आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाकाल मंदिराच्या गर्भगृहात शिरले पावसाचे पाणी, पाहा फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैनमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. क्षिप्रा नदीच्या किनाऱ्यावरील अनेक मंदिरे जलमय आहेत. महाकाल मंदिर उंचावर आहे. येथे पाणी पोहोचू शकत नाही. मात्र, मंदिर परिसरातील कोटितीर्थ कुंड भरले आहे. याच कुंडातील पाण्याने अभिषेक होत असतो. ते पाणी स्वत:हून गर्भगृहापर्यंत पोहोचले. मंगळवारी पहाटे नित्यनेमानुसार महाकाल मंदिराच्या गर्भगृहाचे दार उघडले गेले आणि पुजारी आश्चर्यचकित झाले. कारण गर्भगृह पाण्याने भरले होते. श्री महाकालही पाण्यात होते. सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीच्या या महाकाल मंदिरात श्री महाकाल पाण्यात असताना आरती व्हावी, असे प्रथमच घडले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, महाकाल मंदिरातील फोटो...
बातम्या आणखी आहेत...