आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, राखी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व आणि रंजक इतिहास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौजन्य- मराठी विश्वकोश
रक्षाबंधनाच्या विधीमुळे श्रावण पौर्णिमेला मिळालेले एक नाव म्हणजे राखी पौर्णिमा. ‘रक्षा’ या संस्कृत शब्दाचा ‘रक्षण’ असा अर्थ असून ‘राखी’ हे त्या शब्दाचेच मराठी रुपांतर होय. या दिनाचे खुप धार्मिक महत्त्व आहे.
अलिकडच्या प्रथेनुसार या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. ही राखी अक्षता, मोहऱ्या व सोने एकत्र बांधून तयार करतात. हळदीत भिजविलेला सुती दोराही राखी म्हणून वापरतात. हल्ली बाजारात तयार मिळणाऱ्या रंगीबेरंगी राख्या बांधल्या जातात. सकाळी स्नानानंतर देव,पितर व ऋषी यांना तर्पण करून दुपारी रक्षाबंधनाचा विधी करावा, असे शास्त्र आहे. भावाने आपले रक्षण करावे म्हणून बहीण राखी बांधते, अशी एक समजूत असली तरी सर्व संकटांपासून भावाचे रक्षण व्हावे, हा रक्षाबंधनामागचा प्रमुख हेतू आहे, असे दिसते.
पुढील स्लाईवर जाणून घ्या, या पौर्णिमेला ‘नारळी पौर्णिमा’ असेही म्हणतात.... सलमान व पारशी लोकांतही नारळ अर्पण करण्याची ही प्रथा आहे....