आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीराम नवमी : या विधीनुसार करा पूजा, हे आहेत शुभ मुहूर्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चैत्र मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला श्रीरामाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी श्रीरामाचे व्रत आणि विशेष पूजन केले जाते. या वर्षी रामनवमी 15 एप्रिल, शुक्रवारी आहे. श्रीरामाची पूजा या विधीनुसार करा...

पूजन विधि
राम नवमीला सकाळी उठून घराच्या उत्तरेला एक सुंदर मंडप बनवून मध्यभागी एक वेदी बनवा आणि त्यावर भगवान श्रीराम आणि सीतेचा फोटो स्थापना करा. त्यानंतर गंध, तुप ,फूल,धूप,दिप अर्पण करून श्रीराम आणि सीतेची पूजा करा. त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करावा...

मंगलार्थ महीपाल नीराजनमिदं हरे।
संगृहाण जगन्नाथ रामचंद्र नमोस्तु ते।।
ऊँ परिकरसहिताय श्रीसीतारामचंद्राय कर्पूरारार्तिक्यं समर्पयामि।

त्यानंतर ताम्हनात कापूर तसेच तुपाचा दिवा लावून श्रीरामाची आरती करावी. आरती झाल्यानंतर खालील मंत्राचा उच्चार फुल-अक्षता वाहतांन करावा.

नमो देवाधिदेवाय रघुनाथाय शार्गिणे। चिन्मयानन्तरूपाय सीताया: पतये नम:।। ऊँ परिकरसहिताय श्रीसीतारामचंद्राय पुष्पांजलि समर्पयामि।
फुल-अक्षता वाहिल्यानंतर प्रदक्षिणा घालतांना या मंत्राचा जप करावा.

यानि कानि च पापानि ब्रह्महत्यादिकानि च। तानि तानि प्रणशयन्ति प्रदक्षिणपदे पदे।।

पूजा आरती झाल्यानंतर श्रीरामाला नमस्कार करून कल्याणसाठी प्रार्थना करावी.

पूजेचे शुभ मुहूर्त जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...