आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रथसप्तमी : जाणून घ्या सौभाग्य, पुत्र, धन प्राप्तीचे व्रत, कथा आणि महत्त्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी म्हणतात. या दिवशी पूजा करून सूर्याला पायसचा नैवेद्य दाखवतात. भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात पण त्यासाठी त्याची अव्याहत घोडदौड चाललेली असते. त्याच्या रथाला सप्त अश्व असतात. हे अश्व म्हणजे सप्तरंग, सप्तवार, सप्तछंद आहेत. अशी लोकमनाची भावना असल्यामुळे रथसप्तमीच्या व्रताचरणात प्रथम ध्यानमग्नता नंतर नाममंत्रासह सूर्यनमस्कार आणि अखेरीस तीर्थप्राशन हे नित्याप्रमाणेच करायचे असते. रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे. देवगणांसाठी देवरथ, राजा महाराजांनी पुष्परथ, खेळ, स्पर्धांसाठी क्रीडारथ, स्त्रियांसाठी कणीरथ, रथविद्येच्या रक्षणासाठी वैजयिक रथ, युद्धासाठी सांग्रमिक रथ असे रथांचे विविध प्रकार आहेत. रथचक्र हे समाजजीवनाच्या प्रगतीचे चिन्ह व उत्कर्षाचे प्रतीक आहे.

स्थानपरत्वे बदलती नावे
महासप्तमीला स्थानपरत्वे वेगवेगळी नावे प्राप्त झाली आहेत. बंगालमध्ये या दिवसाला भास्कर सप्तमी म्हणतात. उत्तरेत ही तिथी जयंती सप्तमी व अचला या नावांनी प्रसिद्ध आहे. हा मन्वंतराचा पहिला दिवस असून या दिवशी सूर्यनारायणाची स्वारी सात अश्व जुंपलेल्या रथातून आकाशमार्गे फिरावयास निघते. या समजुतीने दक्षिणेत रथसप्तमी म्हणतात. शब्दकल्पद्रुमकारांनी माघ मासास सामरी मास हे नाव दिले असून या तिथीला माकरी सप्तमी म्हटले आहे. तसेच सूर्य सप्तमी, भानू सप्तमी या नावांनीही ही सप्तमी ओळखली जाते. त्या त्या प्रांतानुसार पूजेमध्ये बदल होत गेला आहे.
रथसप्तमीची कथा जाणून घेण्यासाठी पुढील फोटोवर क्लिक करा...