आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण भारतात का केले जाते केळीच्या पानावर भोजन, जाणून घ्या या अनोख्या परंपरेचे कारण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन - केळी अनेक गुण असलेले फळ आहे. केळीच्या झाडामध्ये अनेक औषधीय गुण उपलब्ध असतात. आपल्या धर्म ग्रंथांमध्ये केळीच्या झाडाला पवित्र वृक्ष मानले गेले आहे. त्यामुळे याची पुजादेखील करण्यात येते. विशेष म्हणजे काही विशेष पुजेच्यावेळी या पानांचे मंडपदेखील तयार करण्यात येते. केळीचे वृक्ष भगवान विष्णुला अतिशय प्रिय असल्याचे मानले जाते. ज्या व्यक्तींचे लग्न होण्यासाठी विलंब होत असतो. अशा व्यक्तींनी केळीच्या झाडाची पुजा करण्यास सांगितले जाते. वास्तूशास्त्रानुसार घराच्या समोर अथवा बगीच्यामध्ये केळीचे झाड लावणे चांगले मानले जाते.
भारतातील काही भागांमध्ये विशेषकरुन दक्षिण भारतामध्ये याच्या पवित्रतेमुळे याचा उपयोग भोजन करण्यासाठीदेखील करण्यात येतो. परंतु, भोजन करण्यासाठी उपयोगात आणले जाणा-या या पानाचे वैज्ञानिक कारण तुम्हाला माहित आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला केळीच्या पानावर भोजन करण्याचे कोणते फायदे आहेत हे सांगणार आहोत.

- केळीच्या पानापासून मिळणारी फायबर चटई, जाड पेपर आणि पेपर पल्प बनण्याच्या कामी येते. केळीच्या पानावर गरम जेवण वाढल्यानंतर या पानामध्ये उपलब्ध असलेले पोषक तत्वदेखील पदार्थांमध्ये मिसळले जातात. हे तत्त्व आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
- रोज केळीच्या पानावर भोजन केल्याने केस काळे आणि चमकदार राहण्यास मदत होते.
केळीच्या पानाचे फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...