आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचीन काळी स्त्रियांसाठी होते हे कठोर नियम, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी नेवासे तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढत एका तरुणीने चौथऱ्यावर जाऊन शनैश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर या घटनेचा काही लोकांनी तीव्र निषेध केला तर काहींनी समर्थनही केले. परंतु भारतामध्ये प्राचीन काळापासून स्त्रियांसाठी काही खास नियम लावण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला गरुड पुराण, शिवमहापुरणातील स्त्रियांसाठी सांगण्यात आलेल्या काही नियमांबद्दल सांगत आहोत.
सा भार्या या गृहे दक्षा सा भार्या या प्रियंवदा।
सा भार्या या पतिप्राणा सा भार्या या पतिव्रता।। (108/18)
अर्थ - जी पत्नी गृहकार्यात दक्ष, जी प्रियवादिनी, पतीच तिच्यासाठी प्राण आहे आणि जी पतिपरायणा आहे वास्तवामध्ये तीच पत्नी आहे.

धर्माचे आचरण -
गरुड पुराणानुसार जी पत्नी स्नान करून पतीसाठी श्रुंगार करते, कमी खाते, कमी बोलते तसेच सर्वगुण संपन्न आहे. जी निरंतर धर्माचे आचरण करते तसेच पतीला प्रसन्न ठेवते तीच खर्‍या अर्थाने पत्नी आहे.

शिवमहापुरणातील रुद्रसंहितेमध्ये शिव-पार्वती विवाह प्रसंगात पतिव्रता स्त्रीसाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी माता पार्वतीला एका ब्राह्मण पतिव्रता पत्नीने सांगितल्या आहेत. व्यवहारिक दृष्टीने वर्तमान काळात या गोष्टींचे अनुकरण करणे फार कठीण आहे.

नोट - शिवमहापुरणा, गरुड पुराण प्राचीन काळातील अत्यंत प्रचलित ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये सुखी जीवनासाठी विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या पुराणामध्ये सांगण्यात आलेल्या काही गोष्टी अशाही आहेत, ज्या सध्याच्या काळाशी प्रासंगिक नसून या गोष्टींचे पालन करणेही प्रत्येकाला शक्य नाही. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या गोष्टींचे आम्ही समर्थन करत नाहीत. ही स्टोरी फक्त वाचकांचे शास्त्राशी संबंधित ज्ञान वाढवण्यासाठी आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, शिवमहापुराणानुसार पतिव्रता स्त्रीने कोणत्या नियमांचे पालन करावे...